
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर मंत्र्यांपेक्षा अत्यंत उजवी कामगिरी बजावली आहे. पाणंदमुक्ती असो वा काही जमिनीची हिस्सेवाटप मोजणीचे शुल्क असो कमी करण्याचे धाडसी निर्णय त्यांनी घेतले. इतरही अनेक योजना त्यांनी आणल्या. त्यांच्या या कामाच्या धडाक्याचे राज्यात कौतुक होत आहे. आपल्या कामातून वेगळी छाप टाकण्यात ते बेमालूमपणे यशस्वी झाले आहेत. आता त्यांनी कागदी बाँड हद्दपार केले आहेत. त्याजागी आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात करण्यात आली आहे. आयातदार व निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात ई-बाँडची सुरुवात
राज्यात आजपासून इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात झाली आहे. कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ पडताळणीमुळे फसवणुकीस ही आळा बसणार आहे. आधीच्या बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होणार आहे. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे.
ई बॉंड म्हणजे काय? त्याचे फायदे जाणून घ्या
20 दिवसात प्रणाली विकसीत
ई-बाँडविषयी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याविषयीचे फायदे सांगितले. महसूल विभागाअंतर्गत कस्टम डिपार्टमेंट यांच्याकडून ई बॉण्ड प्रणाली लागू झाली आहे. निर्मला सीताराम जी मुख्यमंत्री यांनी आपलं ज्या प्रणाली वर नव्हतं आपलं राज्य ज्या प्रणालीवर नव्हतं. आता आपलं राज्य ई बॉण्ड प्रणालीवर आलेलं आहे, असे ते म्हणाले.
20 दिवसांत ही प्रणाली विकसीत केल्याचे ते म्हणाले. आपला ई बॉण्ड आल्यामुळे 50 हजार कागदपत्रं आपल्याकडे आपल्या सिस्टिमवर राहतील. डिजिटल स्वाक्षरी च्या माध्यमातून हे सुरु राहणार. कागद छपाई वाचणार आहे. कागदोपत्री रेकॉर्ड पाहण्यापेक्षा ई बॉण्ड करार केला जाईल.मोदी जी जसं म्हणतात डिजिजल प्रणाली मध्ये पाऊल पुढे टाकायला हवं तस महाराष्ट्र कडून एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याचे ते म्हणाले.
ई-बाँड प्रणाली असणारे महाराष्ट्र 17 वे राज्य
कस्टम आल्यामुळे 500 रुपयाची गरज नाही. व्यापारला 100 बनवायचे असतील तर आता ई बॉण्ड असणार आहे. स्टॅम्प पेपर घेऊन ठेवायची गरज लागणार नाही. 30 सेकंदात ई-बाँड तयार होईल. Manual पण असणार आहे. स्टॅम्प पेपर ही असणार आहे जर व्यापारांना ई बॉण्ड घ्यायच असेल ते करू शकतात. राज्याला आर्थिक फटका बसणार नाही. अशी प्रणाली आणणारे महाराष्ट्र हे 17 वे राज्य झाले आहे.