VIDEO: मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरून चालणारा, 30 वर्षात एकही आरोप झाला नाही; अनिल देशमुख यांचं ट्विट

| Updated on: Nov 01, 2021 | 1:12 PM

अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ पोस्ट करून आपलं म्हणणं मांडलं आहे. (ex home minister anil deshmukh posted video before ED)

VIDEO: मी सरळमार्गी आणि नैतिकतेला धरून चालणारा, 30 वर्षात एकही आरोप झाला नाही; अनिल देशमुख यांचं ट्विट
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us on

मुंबई: मी अतिशय सरळमार्गाने चालणारा आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. गेल्या 30 वर्षात माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात माझ्यावर एकही आरोप झाला नाही, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख आज ईडी कार्यालयात हजर झाले. त्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ पोस्ट करून आपलं म्हणणं मांडलं आहे. मी सरळमार्गाने चालणारा आणि नैतिकतेला धरून चालणारा व्यक्ती आहे. 30 वर्षात माझ्यावर एकही आरोप झाला नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात एकदाही आरोप झाला नाही. पण आज सिंग देश सोडून पळू गेले, वाझे तुरुंगात आहेत, या लोकांनीच माझ्यावर केलेल्या आरोपाची ईडी आणि सीबीआय चौकशी करत आहे. याचं मला अतिशय दु:ख आहे, अशी सल देशमुख यांनी व्यक्त केली.

नोकरीवरून काढल्यानंतर वाझेंचे माझ्यावर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा सहकारी सचिन वाझेनेही सिंग यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. आज सचिन वाझे हे खुनाच्या आरोपावरून आतमध्ये आहेत. सचिन वाझे यापूर्वी सुद्धा अनेकदा तुरुंगात होते. मी गृहमंत्री असताना सचिन वाझेंना नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यांना नोकरीतून काढल्यावर त्यांनी माझ्यावर आरोप केले. परमबीर सिंग आणि वाझेंच्या आरोपावर माझी चौकशी होत आहे. माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे. त्याचं मला दु:ख होत आहे, असंही ते म्हणाले.

सिंगच देश सोडून पळाले

देशमुख यांनी यावेळी थेट परमबीर सिंग यांच्या गायब होण्यावरच सवाल केला आहे. परमबीर सिंगांनी माझ्यावर खोटे आरोप केले ते सिंग आज कुठे आहेत? सिंग भारत सोडून परदेशात पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. ज्याने आमच्यावर आरोप केला तोच पळून गेला. आज सिंग यांच्या विरोधात त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. अनेक व्यावसायिकांनीही तक्रारी केल्या आहेत. अशा माणसाच्या तक्रारीवरून माझी चौकशी होत आहे, याचं दु:ख आहे, असंही त्यांनी सांगितलं.

माझ्याबद्दल चुकीची माहिती आली

उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जात आहे. चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला जेव्हा ईडीचा समन्स आला. तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मला जेव्हा जेव्हा समन्स आला तेव्हा मी ईडीला माझी याचिका कोर्टात आहे. त्याची सुनावणी सुरू आहे असं सांगतानाच मी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यावर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईल असं सांगितलं होतं. आमच्या सर्व घरावर छापे मारले. आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. सीबीआयने दोनदा समन्स दिलं. दोनदा मी त्यांच्या कार्यालायत जाऊन स्टेटमेटं दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Anil Deshmukh: अखेर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात दाखल, कसून चौकशी होणार?

अमृता फडणवीसांवर मलिकांचे आरोप, सोमय्या म्हणतात, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण फक्त ठाकरे-पवारच करू शकतात

देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचा गंभीर आरोप, पंकजा मुंडे म्हणतात, ‘हे अत्यंत हास्यास्पद’

(ex home minister anil deshmukh posted video before ED)