नायगावमध्ये हाय प्रोफाइल सोसायटीच्या सभासदांमध्ये मारामारी, दगडाने डोकं फोडलं, मारामारीचा व्हिडीओ व्हायरल

झोपडपट्टी, नाका या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून सुद्धा तुंबळ हाणामारी होताना आपण नेहमी पाहिले आहे (Fight Vasai Virar Society).

नायगावमध्ये हाय प्रोफाइल सोसायटीच्या सभासदांमध्ये मारामारी, दगडाने डोकं फोडलं, मारामारीचा व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Oct 09, 2020 | 8:29 AM

वसई : झोपडपट्टी, नाका या ठिकाणी क्षुल्लक कारणावरून सुद्धा तुंबळ हाणामारी होताना आपण नेहमी पाहिले आहे (Fight Vasai Virar Society). पण आता या अशा प्रकारच्या हाणामारीचे दृश्य वसई विरारमधील हाय प्रोफाईल सोसायटीत दिसून आले आहे. येथील सोसायटीच्या सभासदांमध्ये सुद्धा जोरदार हाणामारी झाल्याचे एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आले आहे. एका क्षुल्लक कारणावरुन सभासदांमध्ये मारामारीच्या घटना वाढत असल्याने पोलिसांवरील ताण वाढत आहे (Fight Vasai Virar Society).

वसई विरारमधील या हाणामीरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नायगाव पूर्वेकडील नर्मदा नक्षञ या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री दोन सभासदांमध्ये हाणामारी झाली. या मारामारीत पिता पुत्रीने एका सभासदाचे डोकच फोडलं आहे.

सोसायटीच्या आवारात उभे असणाऱ्या अनुराग पटेल हे सासोयाटीच्या सभासदांबरोबर बोलत उभे आहेत. तेवढ्यात विनोद ईर्ला आणि त्यांची मुलगी उभे असलेल्या अनुराग पटेलला शिवीगाळ करत, मारण्यास सुरुवात केली. शेवटी सोसायटीच्या आवारातील सिमेंट विटाने अनुरागच्या डोक्यावर मारहाण करुन, त्याला रक्तबंबाळ केलं. त्यानंतर वाचवण्यासाठी आलेल्या महिलांमध्ये ही मारामारी झाली. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. या घटनेचा वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

को ऑपरेटिव्ह सोसायटीत प्रत्येक सभासदांनी को ऑपरेट करुनच एकमेकांशी सौहार्दपूर्ण मिळून मिसळून राहिलं पाहिजे. माञ चांगली शिकलेली माणसं जर अशी भांडणं करायला लागली तर आदर्श शिकवायचा कुणाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या :

वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची बदली, रमेश मनाळेंनीच विनंती केल्याची चर्चा

‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट