5

‘बविआ’ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट

लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापालिकेचे प्रशासक म्हणून गंगाथरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे

'बविआ'ची एकहाती सत्ता असलेल्या वसई विरार महापालिकेवर प्रशासकीय राजवट
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 9:55 AM

वसई विरार : वसई विरार महापालिकेवर आजपासून प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे.  28 जून रोजी लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महापालिकेचे प्रशासक म्हणून गंगाथरण डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (BVA Vasai Virar Municipal Corporation Administrative regime)

‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव, वसई विरार नालासोपारा शहरात दरवर्षी उद्भवणारी पूरपरिस्थिती याचे नियोजन करताना प्रशासक गंगाथरण डी यांची कसोटी लागणार आहे.

115 सदस्य संख्येच्या वसई विरार महापालिकेत 109 नगरसेवक असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. मात्र या महापालिकेचा गाडा पहिल्यांदाच प्रशासक हाकणार आहे.

गेल्या तीन महिन्यापासून महापालिकेत आयुक्त आणि लोकप्रतिनिधीमध्ये खटके उडत होते. त्यामुळे प्रशासकीय काळात लोकप्रतिनिधी प्रशासनाला किती सहकार्य करणार, हा प्रश्नचिन्ह आहे.

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची नुकतीच बदली झाली होती. खुद्द मनाळे यांची विनंती आणि प्रशासकीय कारणावरुन बदली झाल्याची चर्चा आहे.

संपूर्ण बातमी वाचा : वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची बदली, रमेश मनाळेंनीच विनंती केल्याची चर्चा

वसई विरारमध्ये ‘कोरोना’चे संकट वाढत असताना जुन्या अधिकाऱ्यांच्या बदलीने महापालिका कामाच्या नियोजनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रमेश मनाळे यांना गेल्या दोन वर्षांपासून वसई विरार महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता.

वसई विरार महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नऊपैकी चार प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त हे सर्वच नवीन आहेत. त्यामुळे कोरोना संकटात प्रशासकीय अडथळे येण्याची भीती वर्तवली जात आहे. (BVA Vasai Virar Municipal Corporation Administrative regime)

कोरोनाचा फैलाव सुरुच

वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोनाने 3500 चा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 303 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3550 झाली आहे.

दिवसभरात 72 जण कोरोनामुक्त झाले असून एकाही रुग्णाला कालच्या दिवसात प्राण गमवावे लागले नाहीत, ही दिलासादायक बाब.

वसई विरार क्षेत्रात कोरोनाबळींची संख्या 105 झाली असून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 1704 झाली आहे. उर्वरित 1741 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

(BVA Vasai Virar Municipal Corporation Administrative regime)

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?