वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची बदली, रमेश मनाळेंनीच विनंती केल्याची चर्चा

वसई विरार महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नऊपैकी चार प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त हे सर्वच नवीन आहेत. (Vasai Virar Mahapalika Additional Commissioner Ramesh Manale Transfer)

वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांची बदली, रमेश मनाळेंनीच विनंती केल्याची चर्चा
Follow us
| Updated on: Jun 26, 2020 | 12:05 PM

वसई विरार : वसई विरार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांची बदली झाली आहे. खुद्द मनाळे यांची विनंती आणि प्रशासकीय कारणावरुन बदली झाल्याची चर्चा आहे. (Vasai Virar Mahapalika Additional Commissioner Ramesh Manale Transfer)

वसई विरारमध्ये ‘कोरोना’चे संकट वाढत असताना जुन्या अधिकाऱ्यांच्या बदलीने महापालिका कामाच्या नियोजनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रमेश मनाळे यांना गेल्या दोन वर्षांपासून वसई विरार महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव होता.

अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी आयुक्तांच्या मानमानीला कंटाळून बदलीची विनंती केली की प्रशासकीय कारणावरुन झाली, यावर मात्र उलटसुलट चर्चा सुरु आहे.

वसई विरार महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि नऊपैकी चार प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त हे सर्वच नवीन आहेत. त्यामुळे कोरोना संकटात प्रशासकीय अडथळे येण्याची भीती वर्तवली जात आहे.

हेही वाचा : पनवेल मनपा आयुक्तांनंतर आता अतिरिक्त आयुक्तांचीही बदली

दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या मुख्य कार्यालयात ‘कोरोना’चा शिरकाव झाला आहे. आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि दोघा वरिष्ठ लिपिकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. या तिघांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

महापालिका मुख्यालय, पोलीस ठाणे, भाजी मार्केट आणि स्थानक परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेचे नवनियुक्त प्रसिद्धी प्रमुख दीपेश वझे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

हेही वाचा : दोनच दिवसात नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द

वसई विरारमध्ये कोरोनाचे थैमान वाढले. दिवसाला सरासरी 100 ते 150 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. कोरोना बाधितांचा मृत्यूदरही वाढला आहे. गेल्या 24 तासात 189 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. एकाचा मृत्यू झाला, तर 20 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2642 वर पोहचली आहे. तर एकूण कोरोनाबळींचा आकडा 101 झाला आहे. वसई विरार क्षेत्रात आजपर्यंत 1450 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1091 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचीही बदली, डॉ. विपीन शर्मा नवे आयुक्त

राज्यात तीन आयएएस अधिकाऱ्यांची बदली, तीन महापालिकांचे आयुक्त बदलले

(Vasai Virar Mahapalika Additional Commissioner Ramesh Manale Transfer)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.