साकीनाक्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, भीषण आगीत 5 होरपळले, एका मुलीचा मृत्यू

| Updated on: Nov 25, 2020 | 12:44 AM

मुंबईतील साकीनाका परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या आगीत 5 जण होरपळले असून एका मुलीचा मृत्यू झालाय.

साकीनाक्यात गॅस सिलिंडरचा स्फोट, भीषण आगीत 5 होरपळले, एका मुलीचा मृत्यू
Follow us on

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे. या आगीत 5 जण होरपळले असून एका मुलीचा मृत्यू झालाय. ही आग आज (24 नोव्हेंबर) रात्री साडेनऊच्या सुमारास लागली. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार ही लेव्हल 1 ची आग आहे (Fire in Chawl at Anand Bhuvan Sakinaka Mumbai Many injured)

साकीनाका येथील जगताप वाडीतील आनंद भवनमधील चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली. या आगीत एकूण 6 जण जखमी झाले होते. यातील एका मुलीचा मृत्यू झाला आहे. अलमास असं या मृत 15 वर्षीय मुलीचं नाव आहे. जखमींमध्ये अनिसा खान (45), अस्मा (60), रिहान (8), सानिया (14), शिफा (16) यांचा समावेश आहे. जखमींवर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रात्री 10 वाजताच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

दरम्यान, याआधी मुंबईत अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे वारंवार लागणाऱ्या या आगीच्या घटना रोखण्यासाठी पालिकेकडून ठोस उपाययोजना होण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

Mumbai Fire : मुंबईच्या नागपाड्यातील मॉलमध्ये भीषण आग

कुर्ल्याच्या मेहता इमारतीला लागलेली आग अखेर नियंत्रणात

दक्षिण मुंबईतील क्रॉर्फ्ड सुपर मार्केटला आग, 5 अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल

व्हिडीओ पाहा :

Fire in Chawl at Anand Bhuvan Sakinaka Mumbai Many injured