मुंबईत पहिली दुर्घटना, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना मुलाचा मृत्यू
दहिहंडी सणाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र या सणावर यंदाही विरजन पडलं आहे. कारण दहीहंडी फोडताना 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

गोपाळकाला निमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये दहिहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असं असताना मुंबईत एक दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र जल्लोष सुरू असताना मुंबईत मात्र या सणाला गालबोट लागलं आहे. दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी असं सजग नागरिक सांगत आहेत. आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 32 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us