सेप्टीक टँकमध्ये तिघांचा, तर नाल्यात 2 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

ठाणे : नालासोपारा पश्चिम येथे एका इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 मजुरांचा मृत्यू झाला. तसेच अन्य एका ठिकाणी नालासोपारा पूर्व-पश्चिम नाल्यात 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत. नालासोपाऱ्यात एकाच दिवशी 12 तासात एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास नालासोपारा आणि तुलिंज पोलीस करत आहेत. […]

सेप्टीक टँकमध्ये तिघांचा, तर नाल्यात 2 जणांचा मृत्यू
Follow us on

ठाणे : नालासोपारा पश्चिम येथे एका इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 मजुरांचा मृत्यू झाला. तसेच अन्य एका ठिकाणी नालासोपारा पूर्व-पश्चिम नाल्यात 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत. नालासोपाऱ्यात एकाच दिवशी 12 तासात एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास नालासोपारा आणि तुलिंज पोलीस करत आहेत.

नालासोपारा पश्चिममधील कारशेड समोर विनय कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्समध्ये आनंद व्ह्यूव या इमारतीच्या सेप्टीक टँक सफाईसाठी रात्री 6 मजूर काम करत होते. त्यातील एक मजूर सेप्टीक टँकमध्ये उतरल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो टाकीतच बेशुध्द पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी 2 मजूर गेले. मात्र, टँकमध्ये विषारी गॅसचे प्रमाण एवढे होते की या तिन्ही मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाला. सुनील चावरिया (30), प्रदीप सरवटे (25), बिका बुंबक (25) अशी मृत मजूरांची नावे आहेत.

आनंद व्ह्यू सोसायटीत चेंबर सफाईसाठी 6  मजुरांना बोलावण्यात आले होते. मजुरांनी रात्री जेवण केले. त्यानंतर त्यांच्यापैकी एक मजूर रात्री 12.30 च्या सुमारास सेप्टीक टँकमध्ये उतरला. टँकमध्ये त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी तो आतमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचवायला इतर 2 मजूर गेले, मात्र या तिन्ही मजुरांचा गुदमरुन मृत्यू झाला. पोलिसांनी रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी इमारतीच्या सुपरवायझरलाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकांसह 8 जणांवर गुन्हा दाखल केला. यात मजूरांच्या इतर साथीदारांवरही हलगर्जीपणा केल्याचे सांगत गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे नालासोपारा पूर्व आणि पश्चिमच्या नाल्यात दुपारच्या सुमारास 2 मृतदेह आढळून आले आहेत. एक मृतदेह नालासोपारा पश्चिमकडील शुरपार्क मैदानाच्या बाजुच्या नाल्यात  आढळला. त्याचा मृतदेह पूर्णपणे फुगला होता. दूसरा मृतदेह नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन जवळच्या नाल्यात  आढळला. त्या मृतदेहाच्या पॉकेटमधून आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड सापडले. त्यावर अविनाश मनोहर दूधाने असे नाव आहे. पत्त्यावरुन तो व्यक्ती मुंबईचा रहिवासी असल्याचे समजते. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह नाल्यातून बाहेर काढले आहेत. तसेच शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरु आहे.