Ganesh Naik: भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा, नेरुळ पोलिसांकडून गुन्हा दाखल

| Updated on: Apr 18, 2022 | 10:03 AM

नेरुळ पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरुन आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Ganesh Naik: भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा, नेरुळ पोलिसांकडून गुन्हा दाखल
गणेश नाईक
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईकांवर (BJP MLA Ganesh Naik) बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. ऐरोली भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी त्यामुळे आता वाढण्याची शक्यता आहे. रिव्हॉल्वर दाखवून ठार मारण्याची धमकी (Death threat) दिल्याचा आरोप करणाऱ्या महिलेनं गणेश नाईकांविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन गणेश नाईकांविरोधात बलात्काराचा गुन्हा (Rape crime) दाखल करण्यात आला आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरुन आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेनं गणेश नाईक यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. या महिलेनं गणेश नाईक यांच्यासोबत असलेल्या मैत्रीच्या संबंधाचं प्रेमात रुपांतर झाल्याचं सांगितलं असून त्यानंतर संमतीनं दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित जाले. नाईकांच्या सांगण्यावरुन ही महिला नंतर परदेशात राहायला गेली. त्यानंतर पुन्हा या महिलेला नवी मुंबईत आणण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर नवी मुंबईतील घरातही या तक्रारदार महिलेसोबत गणेश नाईक यांनी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक शोषण केल्याचं तक्रारीत म्हटलंय.

नेमकं प्रकरण सविस्तर समजून घ्या…

तक्रारदार महिला कोण आहे, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. दरम्यान, तक्रारदार महिला ही बिग फ्लॅश स्पोर्ट्स क्लबमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. ही गोष्ट आहे 1993 सालची!

  1. 1993 साली गणेश नाईक वारंवार या क्लबमध्ये येत असता. वेगवेगळ्या बैठकींसाठी गणेश नाईकांचं या क्लबमध्ये येणं व्हायचं. त्यामुळे या महिलेशी गणेश नाईकांची ओळख झाली. ओळखीनंतर संपर्ख वाढला.
  2. 1995 साली दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यावेळी गणेश नाईक यांनी महिलेला पारसिक हिल येथील बंगल्यात नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले, असा दावा तक्रारदार महिलेनं केलाय.
  3. पुण्यातही दोघांच्या संमतीनं शरीरसंबंध प्रस्थापित झाले असल्याचंही या महिलेनं म्हटलंय.
  4. 2007 साली ही महिला गणेश नाईक यांच्या सांगण्यावरुन परदेशी म्हणजेच न्यू जर्सी इथं राहायला गेली. ही महिला तेव्हा गरोदर होती. या महिलेनं 18 ऑगस्ट 2007 साली एका मुलाला जन्म दिला.
  5. मुलाच्या जन्मानंतर दोन महिन्यांनंतर गणेश नाईकांनी या महिलेला आणि मुलाला पुन्हा मायदेशी आणलं. ते स्वतः अमेरिकेला आपल्याला परत आणण्यासाठी आले होते, असा दावाही या महिलेनं केला.

प्रेमाचे संबंध, मग नेमकं खटकलं कुठे?

त्यानंतर ही महिला नेरुळमधील सीब्रीज टॉवर इमारतती राहत होती. आठवड्यातून तीन वेळा गणेश नाईक घरी येत, असा दावा या महिलेनं केला असून त्यांनी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करत आपलं लैंगिक शोषण केलं, असा गंभीर आरोप या महिलेनं तक्रारीत केलाय. संबंधित महिलेनं दिलेल्या या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा आता दाखल झाला. त्यामुळे गणेश नाईकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

गणेश नाईकांच्या अडचणी वाढल्या, ‘नर्स-शाळकरी मुली’ महिलेच्या तक्रारीनंतर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा

‘गणेश नाईक माझ्या मुलाचे वडील’, महिलेची नाईकांविरोधात पोलिसांत तक्रार

नर्स किंवा शाळेचा युनिफॉर्म घालवून नाचायला लावायचे, गणेश नाईकांवर महिलेचे गंभीर आरोप

पाहा – गणेश नाईक अडचणीत का आले?