AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Naik BJP Leader : गणेश नाईकांच्या अडचणी वाढल्या, ‘नर्स-शाळकरी मुली’ महिलेच्या तक्रारीनंतर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा

नाईक यांच्याविरोधात एका महिलेनं पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडित महिलेनं गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

Ganesh Naik BJP Leader : गणेश नाईकांच्या अडचणी वाढल्या, 'नर्स-शाळकरी मुली' महिलेच्या तक्रारीनंतर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा
गणेश नाईकांच्या अडचणी वाढल्याImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 16, 2022 | 6:28 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजप आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात बेलापूर पोलिस ठाण्या (Belapur Police Station)त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाईक यांच्याविरोधात एका महिलेनं पोलीस ठाणे आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. पीडित महिलेनं गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. गणेश नाईक पीडित महिलेसोबत 1993 पासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. यातून या दोघांना 15 वर्षाचा मुलगाही आहे. महिलेने नाईक यांच्याकडे वैवाहिक आणि पितृत्वाचा अधिकार मागितला असता नाईक यांनी महिलेला आणि तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. (A case has been registered against Navi Mumbai BJP leader Ganesh Naik at Belapur police station)

काय आहेत आरोप ?

पीडित महिला ही नेरुळ येथे राहत असून 1993 साली महिलेची आणि गणेश नाईक यांचे संबंध आहेत. गणेश नाईक यांच्यासोबत गेल्या 29 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचा दावा महिलेने केला आहे. या संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा देखील आहे. लिव्ह इनमध्ये राहत असताना नाईक घरी आले की आपल्याला नर्स किंवा शाळकरी मुलीचा ड्रेस घालून नाचायला लावायचे. तसे न केल्यास ते आपल्याला मारहाण करायचे, असा खळबळजनक आरोप महिलेने केला आहे. तसेच पीडित महिलेने आपल्या आरोपात पुढे म्हटले आहे की, आपण नाईक यांच्याकडे वैवाहिक आणि पितृत्वाचा अधिकार मागितला असता त्यांनी आपल्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.

महिला आयोगाकडून तक्रारीची दखल

लैंगिक अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी याबाबत पीडित महिलेने राज्य महिला आयोगाकडेही तक्रार दाखल दिली होती. महिला आयोगानेही या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणी तात्काळ कारवाई करत 48 तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार आज बोलापूर पोलिस ठाण्यात गणेश नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against Navi Mumbai BJP leader Ganesh Naik at Belapur police station)

इतर बातम्या

Mumbai High Court : कामात अडथळा आणू नका!; इमारत पुनर्विकासासंबंधी मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

PNB Scam : मेहुल चोक्सीच्या नाशिकातील मालमत्तांवर टाच; ‘आयकर’ची कारवाई

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान