PNB Scam : मेहुल चोक्सीच्या नाशिकातील मालमत्तांवर टाच; ‘आयकर’ची कारवाई

चोक्सीवर मोठी कारवाई करीत आयकर विभागाने त्याची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील 9 एकर 28 गुंठे बेनामी जमीन जप्त केली आहे. ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईने चोकसीसह पीएनबी घोटाळ्यातील इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत.

PNB Scam : मेहुल चोक्सीच्या नाशिकातील मालमत्तांवर टाच; 'आयकर'ची कारवाई
मेहुल चोक्सीच्या नाशिकातील मालमत्तांवर टाचImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 5:39 PM

नाशिक : कोट्यवधी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) च्या नाशिकमधील मालमत्तांवर शुक्रवारी आयकर विभागाने जप्ती आणली. चोक्सीची 9 एकर शेतजमीन जप्त करण्यात आली. चोक्सी आणि नीरव मोदी हे पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी जानेवारी 2018 मध्ये देश सोडून परदेशात पळाले होते. चोक्सीवर मोठी कारवाई करीत आयकर विभागाने त्याची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतील मुंढेगावात असलेल्या बळवंतनगरमधील 9 एकर 28 गुंठे बेनामी जमीन जप्त केली आहे. ही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईने चोकसीसह पीएनबी घोटाळ्यातील इतर आरोपींचे धाबे दणाणले आहेत. (Income tax action on Mehul Choksis Nashik property in Punjab National Bank scam case)

याआधी ईडीने जप्त केली होती 1217 कोटींची स्थावर मालमत्ता

पीएनबी घोटाळ्याप्रकरणी याआधी ईडीने मेहुल चोक्सी व त्याच्या समुहाच्या एकूण 1217 कोटींची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर आता आयकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गीतांजली जेम्स समुहाच्या मेहुल चोक्सीची संपत्ती जप्त केली आहे. तसेच चोक्सीविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे. चोक्सीचे मुंबईतील फ्लॅट्स, कोलकात्यामधील मॉल आणि हैदराबादमधील ज्वेलरी पार्क आयकर विभाग व ईडीने ताब्यात घेतले असून त्यात मुंबईतील 15 फ्लॅट, 17 कार्यालयांचा समावेश आहे. तसेच आंध्रप्रदेश, हैदराबादमध्ये जेम्स एसईजी, कोलकातामधील शॉपिंग मॉल, अलिबागमधील फार्म हाऊस, तामिळनाडूमधील 231 एकर जमिनीचा समावेश आहे.

आयकर विभागाने प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रॅन्जेक्शन अॅक्ट अंतर्गत मेसर्स नाशिक मल्टी सर्व्हिसेस एसइझेड लिमिटेड आणि मेसर्स गीतांजली जेम्स लि.ची मालमत्ता जप्त केली आहे. बळवंतनंगर मुंढेगाव, ता. इगतपुरी, जि. नाशिक, येथील जमिन पूर्णपणे केंद्र सरकारच्या सर्व भारमुक्त निहीत असतील. अशा जप्तीच्या संदर्भात कोणतीही भरपाई देय असणार नाही, असे आयकर विभागाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने राज्यसभेत दिली होती कारवाईची माहिती

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने राज्यसभेत कारवाईची माहिती दिली. आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या मालकीची 19,111.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे केंद्र सरकारतर्फे राज्यसभेत सांगण्यात आले होते. चोक्सी भारतातून पळून गेल्यानंतर जून 2018 मध्ये मुंबईच्या न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. चोक्सीने 2018 मध्ये अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले. तेव्हापासून तो अँटिग्वा आणि बारबुडा येथे राहतो. चोक्सी 23 मे 2021 रोजी अँटिग्वा येथून बेपत्ता झाला आणि दुसऱ्याच दिवशी डॉमिनिकामध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली. (Income tax action on Mehul Choksis Nashik property in Punjab National Bank scam case)

इतर बातम्या

Aurangabad | मित्राच्या मदतीने थाटला नवाच उद्योग, भाड्याने कार घ्यायच्या अन् गहाण ठेवायच्या, पुंडलिक नगरात काय प्रकार?

VIDEO : नालासोपाऱ्यात तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.