गणरायाचं विसर्जन सुरू… मुंबई मनपा सज्ज, फ्लड लाईट, जीवरक्षक, नियंत्रण कक्ष तसेच कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी

कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदा देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार 173 ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे.

गणरायाचं विसर्जन सुरू... मुंबई मनपा सज्ज, फ्लड लाईट, जीवरक्षक, नियंत्रण कक्ष तसेच कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 6:31 PM

मुंबई : श्री गणेश चतुर्थी पासून घराघरात आणि मुंबईतील विविध परिसरात विराजमान झालेल्‍या आपल्‍या लाडक्‍या गणरायला आपण अनंत चतुर्दशी दिनी (आज) म्‍हणजेच 19 सप्‍टेंबर ला निरोप देत आहोत. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाचा श्री गणेशोत्सव देखील ‘कोविड-19’ या साथ रोगाच्‍या पार्श्‍वभूमीवर होत असल्याने हा उत्सव अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना वेळोवेळी करण्‍यात आले आहे. या आवाहनाला मुंबईकर नागरिक अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद देत आहेत. येत्या रविवारी अनंत चतुर्दशीच्‍या निमित्ताने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्‍यक ती सर्व व्‍यवस्‍था महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली आहे. या व्यवस्थेंतर्गत महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये साधारणपणे 25 हजार इतक्या संख्येने संबंधित कामगार – कर्मचारी – अधिकारी हे मुंबईकरांच्‍या सेवेसाठी विविध ठिकाणी कर्तव्यार्थ उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ – 2) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली आहे.

या अनुषंगाने अधिक माहिती देताना उप आयुक्त काळे यांनी सांगितले की, कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदा देखील बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार 173 ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे देखील कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 73 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्‍थळे असून, याठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बृहन्‍मुंबई महानरगपालिकेद्वारे विविध सेवासुविधा उपलब्‍ध करुन देण्यात येत आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्‍थळी 715 जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत, यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी 587 ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर विविध ठिकाणी 338 निर्माल्य कलश, 172 निर्माल्य वाहन, 185 नियंत्रण कक्ष, 144 प्राथमिक उपचार केंद्र, 39 रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 145 स्वागतकक्ष, 84 तात्पुरती शौचालये, 3 हजार 707 फ्लड लाईट, 116 सर्च लाईट, 48 निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी 36 मोटर बोट व 30 जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी सरंक्षण कठडयांच्या व्‍यवस्‍थेसह विद्युत व्यवस्था देखील आवश्यकतेनुसार करण्‍यात आली आहे.

  • यंदाचा गणेशोत्सव हा ‘कोविड’ या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने संबंधीत प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, २ किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत
  • सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार / फुले इ. चा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल, याची दक्षता घ्‍यावी. तसेच घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणा-यांनी देखील याबाबत दक्षता घ्यावी.
  • घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतोवर घरच्या-घरी बादलीत किंवा ड्रममध्‍ये करावे.
  • गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या-घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी देखील नजीकच्‍या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचे विसर्जन करण्‍यास प्राधान्‍य द्यावे.
  • घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त ५ व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्‍यक्तिंनी ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत व दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत.
  • घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.
  • विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क / शिल्‍ड इ. स्‍वसंरक्षणाची साधने काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.
  • शक्यतोवर लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.
  • सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मास्‍क वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर 10 व्‍यक्तिंनी शक्‍यतो ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणचे २ डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. तसेच कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.
  • सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जना दरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्यास /पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.
  • 2021 च्या गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.
  • मुंबई शहरात एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.
  • नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.
  • महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.
  • मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.
  • विसर्जना दरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर (social distancing), मास्‍क / मुखपट्टी, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  • प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.
  • घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.
  • बृहन्‍मुंबई महानगरपालिका / पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे.
  • उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 व भादवि 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.
  • बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्‍थळी सर्व ती व्‍यवस्‍था केली असून मुंबईकर गणेशभक्‍त नागरिकांनी कोविड या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

इतर बातम्या

अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा

Pune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार

(Ganeshotsav 2021: Mumbai ready to give farewell of Its Favourite God With Covid SOPs)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.