Pune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या गणेशोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी श्रीं चे विसर्जन आणि उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला रविवार, 19 सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी संध्याकाळी 6 वाजून 36 मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे.

Pune Ganeshotsav : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार
दगडूशेठ हलवाई गणपती
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 7:24 AM

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या गणेशोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी श्रीं चे विसर्जन आणि उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला रविवार, 19 सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी संध्याकाळी 6 वाजून 36 मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे. (Immersion ceremony of Dagdusheth Halwai Ganpati can be seen online)

गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिरामध्येच ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सलग दुसऱ्या वर्षी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रीं च्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केलं आहे. दगडूशेठच्या गणपतीचे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार असून ऑनलाईन पद्धतीने भाविकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे.

फुलांनी सजविलेल्या पितळाच्या कुंडामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन

रविवारी संध्याकाळी अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंगल आरती होईल. फुलांनी सजविलेल्या पितळाच्या कुंडामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन होईल. ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… निर्विघ्न या… अशी प्रार्थना यावेळी गणपतीच्या चरणी करण्यात येणार आहे.

अशोक गोडसे म्हणाले की, समस्त पुणेकरांनी आणि गणेशभक्तांनी देखील घराबाहेर न पडता घरीच विसर्जन करावे. यामुळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई लवकर संपविणे शक्य होईल. नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागेल.

ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार दगडूशेठ गणपतीचा विसर्जन सोहळा

गणपतीचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था दगडूशेठ गणपती ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण विसर्जन सोहळा ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

कधी कुठल्या गणपतीचे विसर्जन?

मानाचा पहिला

ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळ : सकाळी 11 वाजता

मानाचा दुसरा

ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ : सकाळी 11 वाजून 45 मिनीट

मानाचा तिसरा

गुरुजी तालीम गणपती मंडळ : दुपारी 12 वाजून 30 मिनीट

मानाचा चौथा

तुळशीबाग गणपती मंडळ : दुपारी 1 वाजून 15 मिनीट

मानाचा पाचवा

केसरीवाडा गणपती मंडळ : दुपारी 2 वाजता

श्रीमंत भाऊ रंगारी सार्वजनिक गणपती मंडळ : दुपारी 2 वाजून 45 मिनीट

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : सायंकाळी 6 वाजून 36 मिनीट

अखिल मंडई गणपती मंडळ : सायंकाळी 6 वाजून 30 मिनीट

विसर्जनासाठी 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी शहरात तब्बल सात हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. मानाच्या आणि प्रमुख मंडळांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी दहा वाजल्यापासूनच मंडपातच विसर्जन होणार आहे. नागरिकांनी घरीच श्रींचे विसर्जन करावे, दर्शनासाठी बाहेर न पडता विसर्जन सोहळा ऑनलाईन पाहण्यावरच भर द्यावा, असे आवाहान पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केलंय.

इतर बातम्या :

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?

‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चा उद्घाटन समारोह, चिन्ना जियार स्वामींकडून पंतप्रधान मोदींना निमंत्रण

Immersion ceremony of Dagdusheth Halwai Ganpati can be seen online

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.