देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 18, 2021 | 8:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत आणि एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यावरुनही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच गाडीत, व्यासपीठावरही गुजगोष्टी! फडणवीस काय म्हणाले?
जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर

Follow us on

धुळे : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युतीबाबत एक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळतेय. अशावेळी नंदुरबारमध्ये या घडामोडींचा दुसरा अंक पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत आणि एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यावरुनही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. (Devendra Fadnavis and Jayant Patil in the same car, Fadnavis’s first reaction after political discussion)

टआज मी आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आलो किंवा एका गाडीत दिसलो त्याचा वेगळा अर्थ घेऊ नये. राजकारण हा फार सिरीयस बिझनेस आहे. कुणी काय बोलले यावर लगेच अंदाज बांधू नये’, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज धुळ्यात बोलत होते.

सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती.

मुख्यमंत्री काल औरंगाबादमध्ये काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ गुगलींने सगळेच अवाक् झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीत पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये नापसंती असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा काही निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याचं सांगितलं जात होतं.

कमालीची शांतता आहे, कोणतंही वादळ नाही

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे तीन पक्षात पडसाद उमटले आहेत का? असा सवाल राऊतांना करण्यात आला. त्यावर पडसाद वगैरे काही नाही. सर्व काही शांत आहे. अलबेल आहे. कोणतंही वादळ नाही. कमालीची शांतता आहे. त्या विधानाने कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पण हे सरकार तीन वर्ष चालणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला सातत्याने बोलावं का लागतं? आशिष शेलारांचा राऊतांचा खोचक सवाल

Devendra Fadnavis and Jayant Patil in the same car, Fadnavis’s first reaction after political discussion

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI