सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला सातत्याने बोलावं का लागतं? आशिष शेलारांचा राऊतांचा खोचक सवाल

राष्ट्रवादीच्या नाराजीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य केलं आहे. त्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय. सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला बोलावं का लागतं? असा सवाल शेलार यांनी केलाय.

सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला सातत्याने बोलावं का लागतं? आशिष शेलारांचा राऊतांचा खोचक सवाल
खासदार संजय राऊत, आमदार आशिष शेलार


मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीत सर्व आलबेल असताना मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य करण्याची गरज काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचं समजतंय. राष्ट्रवादीच्या नाराजीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य केलं आहे. त्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊतांना जोरदार टोला लगावलाय. सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला बोलावं का लागतं? असा सवाल शेलार यांनी केलाय. (Ashish Shelar criticizes ShivSena MP Sanjay Raut over CM Uddhav Thackeray’s Statement)

जो माणूस आपलं पाप लपवायला बघतो. आपल्या पापांवर पांघरुण घालण्यासाठी दिखावूपणे का होईना पण बोलावं लागतो. संजय राऊतही तेच करतात. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला सतत बोलावं का लागतं. सरकार पाच वर्षे टिकणार हे सांगणं म्हणजे आपला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दुबळे आहात, त्यापासून पळण्याचा प्रयत्न म्हणजेच राऊतांचं वक्तव्य असल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे.

भाजपचे बडे नेते शिवसेनेत प्रवेश करु इच्छित असल्याचं वक्तव्यही राऊत यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांनी केलं आहे. त्याबाबत विचारलं असता, प्रवेशाचा मुद्दा असेल तर शिवसेनेकडे कुणी पाहायलाही तयार नाही. भाजप जनतेची लढाई लढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शिवसेनेचं स्थानिक नेतृत्व येत्या काळात भाजपकडे येताना तुम्हाला दिसेल, असा दावाही शेलार यांनी केलाय.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा

संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गणेशोत्सव सुरू आहे. उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं. थोड्यावेळ गप्पा मारल्या. गणपती सुद्धा राजकारण्यांचा गुरू आहे. राजकारण्यांनी गणपतीकडून अनेक गोष्टी शिकव्यात. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो… या चर्चा आतमध्ये. त्या बाहेर कशाला सांगायच्या?, असं राऊत म्हणाले.

कमालीची शांतता आहे, कोणतंही वादळ नाही

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे तीन पक्षात पडसाद उमटले आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर पडसाद वगैरे काही नाही. सर्व काही शांत आहे. अलबेल आहे. कोणतंही वादळ नाही. कमालीची शांतता आहे. त्या विधानाने कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पण हे सरकार तीन वर्ष चालणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज? खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

Ashish Shelar criticizes ShivSena MP Sanjay Raut over CM Uddhav Thackeray’s Statement

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI