प्रत्येक प्रवाशावर 1 रुपया कर आकारला जातो, महिन्याचे 21 कोटी, पडळकरांनी भ्रष्टाचारात थेट ‘मातोश्री’ला ओढलं

| Updated on: Nov 10, 2021 | 2:58 PM

एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशाकडून महिन्याला 21 कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा मातोश्रीत जातो, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (gopichand padalkar allegations on cm uddhav thackeray over msrtc corruption )

प्रत्येक प्रवाशावर 1 रुपया कर आकारला जातो, महिन्याचे 21 कोटी, पडळकरांनी भ्रष्टाचारात थेट मातोश्रीला ओढलं
gopichand padalkar
Follow us on

मुंबई: एसटीकडून प्रत्येक प्रवाशावर एक रुपया कर आकारला जातो. एसटी प्रवाशाकडून महिन्याला 21 कोटी रुपये वसूल करत असते. हा सर्व पैसा मातोश्रीत जातो, असा गंभीर आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात शेकडो आंदोलक जमले असून त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. यावेळी पडळकर यांनी एसटीतील भ्रष्टाचारावरून ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. एसटी महामंडळाकडून एक रुपया प्रत्येक प्रवाशावर कर आकारला जातो. एसटीने रोज 65 लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. रोज 65 लाख महिन्याचे झाले किती? 21 कोटी… वर्षाचे झाले किती..? पैसे जातात कुठे? हे पैसे मातोश्रीत जातात. एढा हे भ्रष्टाचार करतात. कर्मचाऱ्यांना काहीच देत नाही, असा आरोप पडळकर यांनी केला.

तर महामंडळ नफ्यात कसं येईल?

कर्मचाऱ्यांना काही देण्याची वेळ आली की काही तरी बहाणा दिला जातो. रोज काही तरी सांगायचं.भानगडी करायच्या असं सुरू आहे. नेहमी महामंडळ तोट्यात असल्याचा बहाणा दिला जातो. महामंडळ फायद्यात येईल कसं? एक डिझेलचा टँकर डेपोला गेला तर एक विकायला जातो. महामंडळ कसं फायद्यात येईल? असा सवाल करतानाच पूर्वी 18 कोटीत तुमचे ड्रेस व्हायचे. आता 90 कोटीत ड्रेस विकत घेत आहे, असा दावाही त्यांनी केला.

अडीच हजारात तेलाचा डबा तरी येतो का?

भाजप एसटी कामगारांचे माथे भडकवत असल्याचा आमच्यावर आरोप केला जातो. आम्ही तुमची माथी भडकवत आहोत काय? तुम्ही या ठिकाणी मनानेच आलात ना? असा सवाल करून गोरगरीबांवर अन्याय होत असेल तर त्याच्यापाठी खंबीर उभं राहण्याचं काम आमचं आहे. आम्ही विरोधी पक्ष आहोत. ते आमचं कर्तव्य आहे. तुम्ही आज आडवाल उद्या काय कराल? असा सवालही त्यांनी केला. दिवाळीचा बोनस म्हणून कामगारांना अडीच हजार रुपये देण्यात आले. अडीच हजारात तेलाचा डबा तरी येतो का? असा सवालही त्यांनी केला.

जोरदार घोषणाबाजी

दरम्यान, आज सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. कसाळी किरीट सोमय्या आणि पडळकर हे आमदार निवासातून बाहेर पडले आणि मोर्चात सामील झाले. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ठाकरे सरकार हाय हाय, एसटीचं विलनीकरण झालंच पाहिजे… अशा घोषणा द्यायला कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. यावेळी शेकडोच्या संख्येने एसटीचे कर्मचारी उपस्थित होते. आंदोलकांच्या घोषणने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमय्या आणि पडळकर आमदार निवासातून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. त्यामुळे आंदोलक आणखीनच संतप्त झाले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे वातावरण अधिकच तापले होते. पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आणखीनच गोंधळ निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या:

VIDEO: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पेटले, मंत्रालयावर धडकण्याआधीच सोमय्या, पडळकरांची धरपकड; आंदोलक संतापले

हायड्रोजन सोडा, मलिकांना आता ऑक्सिजनची गरज पडेल, आशिष शेलारांचा घणाघाती हल्ला

VIDEO: शरद पवार, उद्धव ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंसोबत रियाझ भाटीचे फोटो; आशिष शेलारांच्या आरोपांनी खळबळ

(gopichand padalkar allegations on cm uddhav thackeray over msrtc corruption )