दुःखद बातमी: दीड महिने अथरुणाला खिळून, अखेर गोविंदा प्रथमेश सावंतची झुंज अपयशी…

दहीहंडी उत्सवात मृत्यूमुखी पडलेला प्रथमेश हा दुसरा गोविंदा आहे. यापूर्वी 24वर्षीय संदेश साळवीचा मृत्यू झाला होता. तर आज 20 वर्षीय प्रथमेश सावंतने अखेरचा श्वास घेतल्याची बातमी धडकली आहे.

दुःखद बातमी: दीड महिने अथरुणाला खिळून, अखेर गोविंदा प्रथमेश सावंतची झुंज अपयशी...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 2:42 PM

कृष्णा सोनरवाडकर, मुंबईः दहीहंडी (Dahihandi) उत्सवात जखमी गोविंदा (Govinda) प्रथमेश सावंतचा (Prathmesh Sawant) अखेर मृत्यू झालाय. तब्बल दीड महिने प्रथमेशने मृत्यूशी झुंज दिली. दहीहंडीत पाचव्या थरातून पडलेल्या प्रथमेश सावंतच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून होता. करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातर्फे त्याने दहीहंडी उत्सवात भाग घेतला होता.

आज केईएम रुग्णालयात प्रथमेश सावंत याने अखेरच्या श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमेश सावंतच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रथमेश सावंतवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. अनेक राजकीय नेत्यांकडूनही त्याच्या प्रकृतीची चौकशी सुरु होती. वेळोवेळी आर्थिक मदतही करण्यात येत होती.

यावर्षी दहीहंडी उत्सवात मृत्यूमुखी पडलेला प्रथमेश हा दुसरा गोविंदा आहे. यापूर्वी 24वर्षीय संदेश साळवीचा मृत्यू झाला होता. तर आज 20 वर्षीय प्रथमेश सावंतने अखेरचा श्वास घेतल्याची बातमी धडकली आहे.

प्रथमेश सावंतची कथा कुणालाही हेलावून टाकणारी. 20 वर्षीय प्रथमेश सावंत पेपर टाकून रोजीरोटी कमावत होता. आई लहानपणीच कँसरने गेली. ऐन उमेदीच्या काळात वडिलांचाही मृत्यू झाला.

प्रथमेशची एक बहीण काकीसोबत राहते तर प्रथमेश पेपर टाकणे, पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करायचा.

दहीहंडीदरम्यान, तो कोसळल्यानंतर प्रथमेशच्या पाठीचा कणा मोडला. तेव्हापासून तो बेडवरच होता. हातांच्या बोटांची हालचाल नव्हती.

प्रथमेशला मसल्स पॅरेलेसिस झाला होता. त्याच्यावर मोफत उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आज अखेर केईएम रुग्णालयात प्रथमेशचा मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.