
मुंबईत पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. सकाळच्या टप्प्यात जोरदार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. त्यानंतर थोडीशी अल्पशी विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सुरु झाला. पण आज ऊन पावसाचा खेळ सकाळपासून सुरुच आहे.

श्रावण महिन्यात जसा ऊन सावल्याचं पाठशिवणीचा खेळ जसा सुरु असतो, अगदी त्याच प्रकारे आज मुंबईत पाऊस-अल्पशी विश्रांती-पुन्हा पाऊस असं वातावरण पाहायला मिळत आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं आहे. विलेपार्ले, जोगेश्वरीला हायवेवरही पाणी साचल्याचं चित्र आहे.

परिणामी महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

12 जुन्या उड्डाणपुलांच्या जागी नव्या केबल पुलची उभारणी

तर पावसामुळे लोकलची वाहतूकही कोलमडली मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक स्लोवरून फास्टवर वळवण्यात आली.

वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना कामावर जाण्यासाठी उशीर होत आहे. एकूणच चालकांची तारांबळ उडत असल्याचं चित्र आहे.

ही वाहातूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.