
आशिया खंडातील सर्वात मोठा धोबीघाट म्हणजे मुंबईच्या महालक्ष्मी येथील धोबीघाट. देशाच्याच नव्हे तर विदेशी पर्यटकांनाही या हा धोबीघाटचे विशेष आकर्षण आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळणाऱ्या मुंबईकरासांठी धोबीघाट मूलभूत गरजांपैकी एक गरज झालाय. दिवसाला सुमारे लाखो कपडे धुवून देणाऱ्या धोबीघाटाची नोंद गिनिज बुकमध्ये झालीय. मळलेले कपडे पांढरेशुभ्र करून देणाऱ्या याच धोबीघाटाला अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये पाहिलं असेलच. पण, या धोबीघाटचा इतिहास काय? तो का आणि कधी बांधला गेला? धोबीघाटमधील काम कसं चालतं? किती मजूर येथे झटतात? त्यांच्या कामाचं व्यवस्थापन कसं असतं? मुंबई महापालिका धोबीघाटमधील धोबीवाल्यांकडून दर महिना भाडं का आणि कशासाठी घेते? नव्या तंत्रज्ञानाच्या युगात घरोघरी वॉशिंग मशीन्स आल्या. घरगडी, कामवाल्या महिल्या आल्या. त्यांचा या व्यवसायावर काही परिणाम झाला का? याविषयी सर्व काही जाणून घेऊ. धोबीघाटचा इतिहास 1880 मध्ये भारतात ब्रिटिश राजवट होती. त्यावेळी ब्रिटिश, राजे-महाराजे, पोर्तुगीज, पारसी YA समाजाचे लोक प्रतिष्ठीत मानले जात असत....