‘कोरोना’शी झुंजताना प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत

| Updated on: Apr 26, 2020 | 7:14 PM

महाराष्ट्रात आतापर्यंत 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 17 अधिकाऱ्यांचा, तर 90 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (Anil Deshmukh Mumbai police Corona)

कोरोनाशी झुंजताना प्राण गमावलेल्या दोन्ही पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिस दलातील दोन हवालदारांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. (Anil Deshmukh Mumbai police Corona) ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच केली होती.

‘दुर्दैवाने मुंबई पोलिसांच्या दोघा कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात बलिदान दिले. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत आहे. दोन्ही परिवारांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल. आम्ही त्यांना आवश्यक ते सर्व देऊ’ असं अनिल देशमुख म्हणाले.

गेल्या दोन दिवसात मुंबई पोलिस दलातील दोन पोलिसांचा बळी गेला. मुंबई पोलिस दलातील 52 वर्षीय हवालदाराचा आज (26 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला. तर काल (25 एप्रिल) 57 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबललाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता.

हेही वाचा : ‘कोरोना’ लढ्यातील महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच, अजित पवारांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात आतापर्यंत 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 17 अधिकाऱ्यांचा, तर 90 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयातील अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. आतापर्यंत सात पोलिस कोरोनामुक्त झाले, ही दिलासादायक बाब आहे.

वर्षा बंगल्यावरील महिला पोलिसाला कोरोना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारी निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं मागील आठवड्यात समोर आलं होतं.

संबंधित बातम्या : 

मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू, कोरोनाचा वाढता कहर

‘मातोश्री’च्या अंगणातील चहावाल्याची कोरोनावर मात, ठाकरे परिवाराचे आभार

(Anil Deshmukh Mumbai police Corona)