AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ठाकरे’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसात किती कमाई?

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित झाला असून, गेल्या दोन दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात ‘ठाकरे’ सिनेमाने तब्बल 16 कोटींची कमाई केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेली बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्याचे दिसून येते आहे. वाचा – REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी […]

'ठाकरे'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दोन दिवसात किती कमाई?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमा 25 तारखेला प्रदर्शित झाला असून, गेल्या दोन दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसात ‘ठाकरे’ सिनेमाने तब्बल 16 कोटींची कमाई केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेली बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडल्याचे दिसून येते आहे.

वाचा – REVIEW : क्षणाक्षणाला अंगावर शहारे आणणारा ‘ठाकरी बाणा’

ठाकरे सिनेमाने 25 तारखेला म्हणजे पहिल्याच दिवशी 6 कोटी रुपयांची कमाई, तर 26 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोन दिवसात 16 कोटींची कमाई ठाकरे सिनेमाने केली आहे.

शिवसेना स्थापन होण्याचे आधीचे काही वर्षे, शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतरचे काही वर्षे असा सुरुवातीचा पट या सिनेमातून मांडला गेला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसांनी 60-70 च्या दशकात उठवलेला आवाज, पुढे हिंदुत्त्वाची धरलेली कास, दरम्यानच्या काळातली महत्त्वाची आंदोलने इत्यादी गोष्टी या सिनेमात आहेत.

ठाकरे सिनेमा आणि वाद-चर्चा वगैरे

  1. ठाकरे सिनेमावरुन पहिली काहीशी नकारात्मक चर्चा सुरु झाली ती सिनेमात बाळासाहेबांसाठी वापरण्यात आलेल्या आवाजावरुन. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजावर अनेकांनी सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षातही नापसंती दर्शवली होती.
  2. संभाजी ब्रिगेड या संघटनेने ठाकरे सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. छत्रपती संभाजी महाराज यांची सिनेमात बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता.
  3. ठाकरे सिनेमातील ‘हटाव लुंगी’ या शब्दांवरुन सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. या शब्दांमुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावतील, असे मत सेन्सॉर बोर्डाने मांडला. त्यानंतर ‘उठाव लुंग’ असे बदल या शब्दांमध्ये सिनेमात करण्यात आले.
  4. ठाकरे सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या अर्ध्यातून निघून जाण्यावरुन नाराजीनाट्य पाहावयास मिळाले. त्यावरुन 23 आणि 24 जानेवारीला उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मात्र, गर्दी असल्याने आपण माघारी गेलो, असे समजुतीचे स्पष्टीकरण अभिजीत पानसे यांनी दिले आणि वाद मिटला.

वाचा – हिंदी की मराठी? ठाकरे सिनेमा कोणत्या भाषेतला पाहाल?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...