“गांधींना नोटेवरुन काढा आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवा”

| Updated on: Jun 03, 2019 | 11:01 AM

मुंबई : महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आपल्याला गांधींना नोटेवरुन काढायला हवे. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला हवेत, असे वादग्रस्त वक्तव्य एका महिला IAS अधिकाऱ्याने केले आहे. निधी चौधरी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नियुक्ती करण्यात आली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. निधी यांनी […]

“गांधींना नोटेवरुन काढा आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवा”
Follow us on

मुंबई : महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आपल्याला गांधींना नोटेवरुन काढायला हवे. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला हवेत, असे वादग्रस्त वक्तव्य एका महिला IAS अधिकाऱ्याने केले आहे. निधी चौधरी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नियुक्ती करण्यात आली आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

निधी यांनी ट्वीट केले, “गांधींची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. हीच योग्य वेळ आहे गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्यासाठी आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यासाठी. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे 30. 01.1948 साठी.’

राष्ट्रवादीकडून निधी चौधरींच्या निलंबनाची मागणी

निधी यांच्या ट्विटच्या शेवटी गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेचे त्याने 30 जानेवारी 1948 रोजी गांधी हत्या केल्याबद्दल आभारही मानण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ट्विटचा कडाडून विरोध केला आहे. तसेच निधी यांचे निलंबन करावे, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गांधीजींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने आम्ही निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी करतो. त्यांनी गांधींचा हत्यारा नथुराम गोडसेचे आभार मानले आहे. हे कधीही सहन केले जाणार नाही.”

वादानंतर ट्विट डिलिट

वादानंतर निधी यांनी आपले ट्विट डिलिट केले. त्यांनी नवे ट्विट करत म्हटले, “मी 17 मे रोजीचे माझे ट्वीट डिलिट केले आहे. काही लोकांचा त्यामुळे गैरसमज झाला आहे. त्या लोकांनी माझ्या टाईमलाईनवर जाऊन माझे 2011 पासूनचे ट्विट पाहिले तर मी गांधींचा अपमान करण्याच विचारही करु शकत नाही हे त्यांना कळेल. मी गांधींसमोर पूर्ण श्रद्धेने नतमस्तक होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेच करत राहिल.” यावेळी निधी यांनी आपले संबंधित ट्विट उपरोधात्मकपणे लिहिले होते. त्याला चुकीच्या पद्धतीने घेतल्याचेही नमूद केले.

निधी चौधरी 2012 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांनीही याआधी गोडसेला देशभक्त म्हणत कौतूक केले होते. त्यानंतरही मोठा वाद निर्माण झाला होता.