VIDEO : बसच्या डिक्कीतून कुत्र्याच्या पिल्लांची अवैध वाहतूक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका बसमधून पाळीव कुत्र्यांची निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं. बसच्या डिक्कीतून या कुत्र्याच्या पिल्लांची वाहतूक केली जात होती. मुंबईच्या मुलुंड परिसरात ही घटना उघडकीस आली. एका बसमधून अतिशय निर्दयीपणे पाळीव कुत्र्यांची वाहतूक केली जात होती. बेनेवोलेंत असोसिएशन ऑफ वेल्फेअर या प्राणीमित्र संस्थेला एका […]

VIDEO : बसच्या डिक्कीतून कुत्र्याच्या पिल्लांची अवैध वाहतूक
Follow us on

मुंबई : मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका बसमधून पाळीव कुत्र्यांची निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं. बसच्या डिक्कीतून या कुत्र्याच्या पिल्लांची वाहतूक केली जात होती. मुंबईच्या मुलुंड परिसरात ही घटना उघडकीस आली.

एका बसमधून अतिशय निर्दयीपणे पाळीव कुत्र्यांची वाहतूक केली जात होती. बेनेवोलेंत असोसिएशन ऑफ वेल्फेअर या प्राणीमित्र संस्थेला एका खाजगी बसमधून पाळीव कुत्र्यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या संस्थेच्या स्वयंसेवकांनी याची माहिती नवघर पोलिसांना दिली. मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर नवघर पोलिसांच्या मदतीने या स्वसंसेवकांनी इंदूरहून येत असलेल्या एका खाजगी बसला आनंदनगर टोल नाक्यावर अडवले. पोलिसांनी नाकाबंदी करत या बसचा तपास घेतला, तेव्हा या बसच्या डिक्कीतून पाळीव कुत्र्यांची निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचं समोर आलं. यामध्ये एका बॅस्केटमधून 4 लॅब्रो डॉग आणि पग जातीच्या पिलांना वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

या पिल्लांना एका बंदिस्त आणि अंधाऱ्या जागेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय गंभीर झाली होती. सुखजित सिंग आणि रणजीत सिंग हे दोघे या पिलांची वाहतूक करत होते. स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी या दोघांवर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सध्या या पिल्लांची स्थिती नाजूक असून त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत.