मुंबईतील गोरेगावात धक्कादायक प्रकार, दहा वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांचा बाळाला इमारतीवरुन फेकले….
मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने शेजारच्या अवघ्या अठरा महिन्याच्या बाळाला इमारतीवरुन फेकून दिल्याची घटना घडली आहे.

मुंबईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथे एका दहा वर्षांच्या मुलीने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरातील १८ महिन्याच्या बाळाला उचलून इमारतीखाली फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही तपासले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एडीआर दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव पूर्व येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका दहा वर्षांच्या मुलीने शेजारी घरातील अठरा महिन्याच्या बाळाला इमारतीच्या वरुन फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेप्रकरणात पोलिसांंनी एडीआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही तपासण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास दिंडोशी पोलिसांकडून सुरु असल्याची माहिती आहे.
इमारतीच्या डक्टमधून खाली फेकले
एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीने शेजारील १८ महिन्याचा बाळाला इमारतीच्या डक्टमधून खाली फेकल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही पाहिला तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आता दिंडोशी पोलिस अधिक तपास करत आहेत. नेमके कशी ही घटना घडली आणि या मुलीने त्या बाळाला इमारतीच्या डक्टमधून कसे काय खाली फेकले याचा तपास केला जात आहे.