Mumbai Water Supply : मुंबईत काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार

Mumbai Water Supply : मुंबईत काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा 18 तासांसाठी बंद राहणार
अबब..! उंदीर मारण्यासाठी मुंबई पालिकेने केले 1 कोटी खर्च

परोक्त नमूद कालावधीतील पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 25, 2022 | 1:28 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी पाण्याची महत्वाची बातमी आहे. पुढील दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा(Water Supply) विभागनिहाय काही तासांसाठी खंडित(Cut off) केला जाणार आहे. महानगरपालिकेतर्फे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरुवारी 27 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शुक्रवार, 28 जानेवारी 2022 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत म्हणजे 27 जानेवारी सकाळी 10 ते 28 जानेवारी 2022 रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत एम/पूर्व आणि एम/पश्चिम या विभागांमधील काही परिसरात 18 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (In some areas of Mumbai, water supply will be cut off for 18 hours)

एम/पूर्व विभाग

प्रभाग क्रमांक 140 – टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग; प्रभाग क्रमांक 141 – देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड; प्रभाग क्रमांक 142 – लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत; प्रभाग क्रमांक 143 – जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर; प्रभाग क्रमांक 144 – देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्थानक मार्ग, टि.आय.एफ.आर. वसाहत; प्रभाग क्रमांक 145 – सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे; प्रभाग क्रमांक 146 – देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. (BARC) फॅक्टरी, बी. ए. आर. सी. (BARC) वसाहत येथे 18 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

एम/पश्चिम विभाग

प्रभाग क्रमांक 151 – साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर; प्रभाग क्रमांक 152 – सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर; प्रभाग क्रमांक 153 – घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क; प्रभाग क्रमांक 154 – चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी; प्रभाग क्रमांक 155 – लाल डोंगर या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सर्व संबंधित विभागातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीतील पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (In some areas of Mumbai, water supply will be cut off for 18 hours)

इतर बातम्या

मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या 650 कोटीच्या निधीस मंजूरी, आदित्य ठाकरे-अजित पवारांमध्ये काय चर्चा?

संजय राऊतांचा व्यंगचित्राद्वारे भाजपला टोला, पुनम महाजनांकडून राऊतांना जोरदार प्रत्युत्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें