तीन दिवसात सुमारे साडे तीन लाख प्रवाशांनी केली मेट्रोसफर

| Updated on: Jan 23, 2023 | 4:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार 19 जानेवारी रोजी मेट्रो 2 अ मार्गिकेच्या वळनई – अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 मधील गोरेगाव पूर्व – गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. शनिवारपासून सकाळी 5.25 ते रात्री 11 या वेळेत या दोन मार्गांवर मेट्रो सुरू झाली आहे.

तीन दिवसात सुमारे साडे तीन लाख प्रवाशांनी केली मेट्रोसफर
metro
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : मुंबईकरांसाठी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मार्गिका ( METRO ) शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी प्रवासासाठी नवे दालन खुले झाले आहे. गेल्या तीन दिवसांत सुमारे साडे तीन लाख प्रवाशांनी मेट्रोसफरीचा आनंद केला आहे. मेट्रोमुळे पश्चिम उपनगरातील (western suburbs) दहीसर, अंधेरी, गोरेगावातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. शनिवारपासून सकाळी 5.25 ते रात्री 11 या वेळेत या दोन्ही मार्गिकेवर पूर्ण क्षमतेने मेट्रो सुरू झाली आहे. दोन्ही मेट्रोतून एकूण तीस स्थानकांवर सेवा मिळत आहे.

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो 2अ आणि दहिसर – गुंदवली मेट्रो 7 मार्गिका गेल्या 20 जानेवारीपासून प्रवाशांसाठी सुरू झाली आहे. पहील्या दिवशी फेज टू मध्ये सायंकाळी चार नंतर 84,929 प्रवाशांनी प्रवास केला. तर दुसऱ्या दिवशी 21 जानेवारीला 1,29,476 प्रवाशांनी प्रवास केला आहे. आणि काल 22 जानेवारीला एकूण 1,33,516 प्रवाशांनी प्रवास केला असून तीन दिवसात अशाप्रकारे एकूण 3,47,921 प्रवाशांनी या दोन्ही मार्गिकावरील मेट्रोतून प्रवासाचा आनंद घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार 19 जानेवारी रोजी मेट्रो 2 अ मार्गिकेच्या वळनई – अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 मधील गोरेगाव पूर्व – गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी 4 वाजता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला. हा टप्पा सेवेत दाखल होताच दहिसर – अंधेरी पश्चिम अशी मेट्रो 2 अ आणि दहिसर – गुंदवली अशी मेट्रो 7 मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागली. पहिल्या दिवशीपासून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारपासून सकाळी 5.25 ते रात्री 11 या वेळेत या दोन्ही मार्गिकेवर पूर्ण क्षमतेने मेट्रो सुरू झाली आहे.