…तर पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती : आव्हाड

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई : काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी […]

...तर पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती : आव्हाड
Follow us on

मुंबई : काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

” काँग्रेसने 60 वर्षात देशासाठी मिराज, मिग, सुखोई घेऊन ठेवली नसती, तर आज पाकिस्तानवर गोमूत्र शिंपडायची वेळ आली असती”, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयईडी स्फोट घडवला आणि यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 26 फेब्रुवारीच्या पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानात घुसून, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर 1000 किलोंचा बॉम्ब टाकला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना मिराज, मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांचा वापर केला. ही लढाऊ विमानं काँग्रेस सरकारच्या काळात खरेदी करण्यात आली होती. त्या गोष्टीचा आधार घेत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, भारताने पाकिस्तानत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, चावताळलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत 10 किलोमीटरपर्यंत 20 विमानं घुसवली होती. मात्र, भारताने पाकिस्तानला पुन्हा प्रत्युत्तर देत, सर्व विमानं माघारी धाडली.