‘लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता’; रोखठोक ट्वीटनंतर आव्हाडांकडून भूमिका स्पष्ट

| Updated on: Sep 17, 2021 | 3:33 PM

मी नाराजी व्यक्त केलेली नाही. मी लहानपणी जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता. गावस्करनंतर मला क्रिकेटमध्ये जास्त रस राहिला नाही. जगातील सगळ्या बॉलर्सला हेल्मेट न घालता खेळणारे गावस्कर होते. गावस्कर यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. गावस्करांना जे ग्राऊंड दिलं आहे. त्यांनी त्यात अनेक गावस्कर तयार केले पाहिजेत.

लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता; रोखठोक ट्वीटनंतर आव्हाडांकडून भूमिका स्पष्ट
सुनील गावस्कर, जितेंद्र आव्हाड
Follow us on

ठाणे : मुंबईच्या बांद्रामधील म्हाडाच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र मागील 30 वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तिथे क्रिकेट अकादमी सुरु केलेली नाही. त्यामुळे हा प्लॉट ताब्यात घेण्याची तयारी महाराष्ट्र सरकारनं दाखवली होती. मात्र, गावस्करांच्या विनंतीनंतर तो प्लॉट गावस्कर ट्रस्टकडेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत गावस्करांना क्रिकेट अकादमी सुरु करण्याची आठवण करु दिली. त्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Jitendra Awhad’s opinion about Sunil Gavaskar and MHADA’s plot in Bandra)

मी नाराजी व्यक्त केलेली नाही. मी लहानपणी जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता. गावस्करनंतर मला क्रिकेटमध्ये जास्त रस राहिला नाही. जगातील सगळ्या बॉलर्सला हेल्मेट न घालता खेळणारे गावस्कर होते. गावस्कर यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. गावस्करांना जे ग्राऊंड दिलं आहे. त्यांनी त्यात अनेक गावस्कर तयार केले पाहिजेत. 30-32 वेळा रणजी जिंकणारा मुंबईचा क्रिकेट संघ आज अडखळताना दिसतो. मुंबईत आता गावस्करांची गरज आहे. गावस्करांकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी चांगले खेळाडू तयार करावेत, असं आव्हाड यांनी म्हटलंय.

गावस्कर यांना सल्ल्याची गरज लागली होती. त्याप्रमाणे नवीन खेळाडूंनाही प्रशिक्षणाची गरज असते. गावस्कर मोठी व्यक्ती आहे. त्यांना भेटून बोलणार आहे. मुंबईत गावस्करांकडून एक चांगली अकादमी तयार होईल तर चांगलंच आहे. मी स्वत: त्यात योगदान देईल, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.

बांद्र्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव

बांद्र्याच्या प्लॉटवर क्रिकेट अकादमी सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही किंबहुना गावस्कर ट्रस्टने तिथे बांधकाम करण्याची हालचालही केली नाही. त्याचमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आव्हाडांचं नेमकं ट्वीट काय?

तसं ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मात्र हे ट्विट करताना जर त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर हा प्लॉट मी रद्द केला असता, असं सांगायला देखील मंत्री जितेंद्र आव्हाड विसरले नाहीत.

नेमकं प्रकरण काय?

रंगशारदा सभागृहाजवळील 21,348 चौरस फूट भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला इनडोअर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी देण्यात आला होता, परंतु दरम्यानच्या 30 वर्षांत तिथे कोणतेही बांधकाम झाले नाही. डिसेंबरमध्ये प्राधिकरणाने राज्य सरकारला भूखंड परत घेण्यास सांगितला होता.

वास्तविक, हा भूखंड 31 वर्षांपूर्वी सुनील गावस्कर यांच्या ट्रस्टला देण्यात आला होता. परंतु दीर्घकाळ तिथे कोणतंही बांधकाम झालं नाही किंबहुना गावस्कर ट्रस्टने तिथे बांधकाम करण्याची हालचालही केली नाही.  त्याचमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ‘गावस्कर ट्रस्ट’ कडून तो प्लॉट परत घेऊ इच्छित होतं. पण सरकारी पातळीवर झालेल्या चर्चेअंती आता गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी संबंधित प्लॉट गावस्कर ट्रस्टकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

इतर बातम्या : 

‘किरीट भाई की दया से सब बढिया है’; व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपच्या ‘अच्छे दिना’वरुन राष्ट्रवादीचा टोला

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाच अर्थ काय?; प्रविण दरेकरांनी मांडल्या दोन थिअरी!

Jitendra Awhad’s opinion about Sunil Gavaskar and MHADA’s plot in Bandra