केडीएमसीतून 18 गावं वगळल्यानंतर आता 13 नगरसेवकांचं नगरसेवकपदही रद्द

| Updated on: Jul 31, 2020 | 11:09 PM

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 13 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाले (Kalyan Dombivali 13 Coroporter post cancelled) आहे.

केडीएमसीतून 18 गावं वगळल्यानंतर आता 13 नगरसेवकांचं नगरसेवकपदही रद्द
Follow us on

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 13 नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. केडीमसीतील 18 गावं वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे नगरसेवकपद्द बाद झाले आहे. तसेच या 18 गावांची कल्याण उपनगर नगरपरिषद स्थापन केली जाणार आहे, असा निर्णय केडीएमसी आयुक्तांनी घेतला आहे. (Kalyan Dombivali 13 Coroporter post cancelled)

केडीएमसीतील 27 गावांपैकी 18 गावं राज्य सरकारकडून वगळण्यात आली आहेत. यात घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्वारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकळी, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा, कोळे या गावांचा समावेश आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

या 27 गावांतील 18 गावं ही महापालिकेतून वगळण्यात आल्यानं या गावातील नगरसेवकांचं पदही रद्द करा, असा अहवाल केडीएमसीच्या निवडणूक विभागाने आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना पाठवला होता.

त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच तिथल्या नगरसेवकांचं पद रद्द झालं आहे. त्यामुळे मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहिरे, प्रभाकर जाधव, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे, जालिंदर पाटील, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे अशा 13 नगरसेवकांचं सदयत्व रद्द झालं आहे. (Kalyan Dombivali 13 Coroporter post cancelled)

संबंधित बातम्या : 

कोरोनाविरोधात महिलांचा नेटका लढा, 59.3 टक्के महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडी

इमारतीचा पुनर्विकास तीन वर्षात न केल्यास ‘एनओसी’ रद्द, ठाकरे सरकार दणका देण्याच्या तयारीत