कोरोनाविरोधात महिलांचा नेटका लढा, 59.3 टक्के महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडी

पुरुषांच्या तुलनेत महिला कोरोनावर मात करण्यात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे (More Anti Corona bodies in Womens).

कोरोनाविरोधात महिलांचा नेटका लढा, 59.3 टक्के महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडी

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून सीरो सर्व्हे केला जात आहे. मुंबईत तीन वॉर्डातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने हा सीरो सर्व्हे केला. यात पुरुषांच्या तुलनेत महिला कोरोनावर मात करण्यात आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे (More Anti Corona bodies in Womens). मुंबईतील 59.3 टक्के महिलांच्या शरीरात कोरोना विषाणूशी लढा देणाऱ्या अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईत कोरोना संसर्गाचा विचार केल्यास महिलांच्या तुलनेत पुरुषांना अधिक प्रमाणात संसर्ग झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून सीरो सर्व्हेत एकूण नमुन्यांपैकी 2 हजार 297 म्हणजेच 59.3 टक्के महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडी असल्याचं आढळून आलं. त्या तुलनेत पुरुषांमध्ये फक्त 1 हजार 937 म्हणजे 53.2 टक्के कोरोना अँटिबॉडी तयार झाल्याचं या सर्व्हेतून स्पष्ट झालं. पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरात कोरोना विरोधातील अँटिबॉडिज अधिक प्रमाणात विकसित झाल्या आहेत. ही महिलांसाठी काहिशी दिलासादायक गोष्ट मानली जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अनेक देशांमध्ये पुरुष आणि स्त्रियांमधील अँटिबॉडीचं प्रमाण सारखंच असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, मुंबईत हे प्रमाण काहीसं वेगळं असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे मुंबईत पुरुषांच्या तुलनेत महिला रुग्णांची संख्या कमी आहे. मुंबईत 45 टक्के महिला कोरोनाबाधित आहेत. तर 55 टक्के पुरुषांना कोरोना संसर्ग झाला आहे. महिलांमधील अँटिबॉडीचं प्रमाण सर्वाधिक आहे. झोपडपट्ट्यांमधील महिलांमध्ये कोरोना अँटिबॉडीचं प्रमाण सर्वाधिक असल्याचंही हा सर्व्हे सांगतो.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, राज्यात बुधवारी (29 जुलै) 9211कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यासह एकूण रुग्णांची संख्या आता 4 लाख 651 इतकी झाली आहे. काल नवीन 7478 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2 लाख 39 हजार 755 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 46 हजार 129 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा :

24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब नमुने, संतापजनक प्रकारानंतर लॅब टेक्निशिअनला बेड्या

माझा सर्जा-राजा उपाशी, बैलजोडीची काळजी, कोव्हिड सेंटरमधून शेतकऱ्याचं पलायन

प्रसुतीनंतर 20 वर्षीय कोरोनाग्रस्त मातेचा अखेरचा श्वास, बाळ सुरक्षित

More Anti Corona bodies in Womens

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *