माझा सर्जा-राजा उपाशी, बैलजोडीची काळजी, कोव्हिड सेंटरमधून शेतकऱ्याचं पलायन

यवतमाळमध्ये कोव्हिड19 सेंटरमधून पळून गेलेला रुग्ण सापडला आहे. मात्र या रुग्णाचं पळून जाण्याचं कारण ऐकून सर्वजण अवाक् झाले. (Yavatmal corona positive farmer)

माझा सर्जा-राजा उपाशी, बैलजोडीची काळजी, कोव्हिड सेंटरमधून शेतकऱ्याचं पलायन
Follow us
| Updated on: Jul 30, 2020 | 11:57 AM

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव इथे कोव्हिड19 सेंटरमधून पळून गेलेला रुग्ण सापडला आहे. पोलिसांनी मोठ्या शिथाफिने या रुग्णाला शोधलं. मात्र या रुग्णाचं पळून जाण्याचं कारण ऐकून सर्वजण अवाक् झाले. (Yavatmal corona positive farmer)

संबंधित रुग्ण हा शेतकरी आहे. या शेतकऱ्यावर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. या शेतकऱ्याचं कुटुंब क्वारंटाईन आहे. मात्र आपल्या माघारी घरी असलेली बैलजोडी उपाशी असेल, या कळवळ्यातून हा शेतकरी कोव्हिड सेंटरमधून काल पळून गेला होता.

मारेगाव येथून काल हा कोरोनाबाधित शेतकरी रुग्ण कोविड सेंटरमधून पळाला होता. आपला लाडका सर्जा-राजा घरी एकटा आहे, त्याला कोणी चारा-पाणी देईल का या विवंचनेत हा शेतकरी होता. सतत हा विचार त्याला अस्वस्थ करुन जात होता. या विवंचनेतून काल सकाळी हा रुग्ण कोव्हिड सेंटरमधून आपल्या गावी जाण्यासाठी निघाला.

मात्र पोलीस आपल्या शोधात असल्याची कुणकुण लागल्याने हा शेतकरी रुग्ण लपून बसला. त्यानंतर तो गावी जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी त्याला शोधून काढलं. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 24 तासात हा शेतकरी कुणाच्याही संपर्कात आला नाही. त्याने स्वत:ला इतरांपासून लांब ठेवलं. मात्र ज्यांच्यावर आपलं आयुष्य आहे, त्या मुक्या जनावरांना उपाशी कसं ठेवायचं, या एकाच प्रश्नाने हा शेतकरी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, कोव्हिड सेंटरमधून निघाला होता.

(Yavatmal corona positive farmer)

संबंधित बातम्या 

Yavatmal Corona | जेवणामध्ये अळ्या आढळल्याची कोरोना रुग्णांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Yavatmal Corona Update | यवतमाळमध्ये 22 कोरोनामुक्त नागरिकांना डिस्चार्ज 

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.