AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने…

कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने सर्वत्र शोधाशोध केली. त्यानंतर अखेर तरुणीने आईला लाईव्ह लोकेशन पाठवलं.

खळबळजनक! कल्याणमध्ये 4 अल्पवयीन मुलींना बळजबरीने घरात डांबून ठेवलं; पीडितेच्या आई सर्वत्र शोधाशोध, अखेर तरुणीने...
kalyan minor news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 7:33 AM
Share

कल्याणमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जोर जबरदस्तीने चार अल्पवयीन मुलींना घरात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेपत्ता मुलीने आईला मेसेज आणि लाईव्ह लोकेशन शेअर केल्याने संपूर्ण प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आई आणि नातेवाईकांनी पोलिसांत तातडीने धाव घेतली. त्यानंतर संबंधित मुलीसह आणखी तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार घडला. एका घरात तीन ते चार अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय. बेपत्ता असलेल्या एका मुलीने आईला मदतीचा मेसेज पाठवत स्वतःचे लाईव्ह लोकेशन शेअर केल्याने हा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलींची सुटका केली असून चेतन माने नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणावर यापूर्वीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासह गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण कोळशेवाडी परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी गेल्या चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता होती. सुरुवातीला ती मैत्रिणीकडे गेली असावी असा कुटुंबीयांचा समज होता. मात्र शोध घेतल्यानंतर ती कुठेच आढळून आली नाही. दरम्यान, अचानक मुलीच्या मोबाईलवरून तिच्या आईला मेसेज आला. चेतन नावाचा तरुण मला मारहाण करत असून एका घरात डांबून ठेवल्याची माहिती तिने दिली. तसेच कशीतरी खिडकीतून बाहेर पडून एका इमारतीखाली लपल्याचं सांगत मदतीची याचना केली.आईने तातडीने मुलीला लाईव्ह लोकेशन पाठवण्यास सांगितलं आणि 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुलीची मावशी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांकडून तपास सुरू 

पोलिसांनी त्या ठिकाणाहून संबंधित मुलीसह आणखी दोन ते तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी चेतन माने या तरुणाला ताब्यात घेतलं असून मुलींचे जबाब नोंदवण्याची आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वीही अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि बलात्काराचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कोळशेवाडी पोलीस या सर्व मुलींची चौकशी करत असून त्यांच्यावर आणखी कोणते अत्याचार झाले आहेत का, याचा तपास सुरू आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार