कल्याण पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना आग, फटाक्याच्या ठिणगीने आग लागल्याची शक्यता

| Updated on: Nov 24, 2020 | 1:48 PM

फायर ब्रिगेडने आग नियंत्रणात आणली नसती, तर ही आग वाढली असती.

कल्याण पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींना आग, फटाक्याच्या ठिणगीने आग लागल्याची शक्यता
Follow us on

कल्याण : कल्याणमध्ये एका हाय प्रोफाईल सोसायट्यांच्या ग्राऊंड फ्लोअरवरुन पोलिसांकडून (Seized Vehicle Get Fire) कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांना अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्वरीत या आगीवर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे (Seized Vehicle Get Fire).

कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोडवर विकास हाईटस् ही हाय प्रोफाईल इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर पोलिसांची पार्किंग आहे. कल्याणची बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनकडून अनेक वर्षांपासून ज्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दुचाकी त्याठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. याठिकाणी अशा शेकडो दुचाक्या आहेत.

काल (23 नोव्हेंबर) रात्री पार्किंगमधून धूर निघू लागला. हे काही रहिवाशांच्या लक्षात आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. काही वेळ परिसरात गोंधळाची परिस्थिती होती. कल्याण फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली गेली. 3 ते 4 दुचाकी जळाल्या आहेत. फायर ब्रिगेडने आग नियंत्रणात आणली नसती, तर ही आग वाढली असती. आज सकाळी कल्याणचे एसीपी अनिल पोवार आणि महात्मा फुले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बनकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

याबाबत एसीपी पोवार यांनी सांगितले की, कदाचित दिवाळीतील फटाक्यामुळे एखादी ठिणगी उडून ही आग लागली असावी. याप्रकरणी तपास सुरु आहे. तीन गाड्यांच्या सीट जळाले आहेत.

Seized Vehicle Get Fire

संबंधित बातम्या :

घणसोलीत 5 मजली इमारतीला भीषण आग, 10-12 दुचाकी जळून खाक, रहिवाशांचा घातपाताचा संशय

मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग, चार दुकानं जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही