कर्नाटकाच्या नागरिकांनी बस फोडल्या तर सेम रिॲक्शन देणार, ‘या’ पक्षाचं त्या सरकारला थेट उत्तर

| Updated on: Dec 06, 2022 | 10:55 PM

कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणून-बुजून दोन राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असंही मनसेकडून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

कर्नाटकाच्या नागरिकांनी बस फोडल्या तर सेम रिॲक्शन देणार, या पक्षाचं त्या सरकारला थेट उत्तर
Follow us on

सोलापूर: महाराष्ट्र-कर्नाटक वादाने आता टोक गाठल्यामुळे दोन्ही राज्यातील राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांची कन्नडिगांनी तोडफोड केल्यामुळे हे वातावरण आणखी चिघळले आहे. त्यामुळे आता कर्नाटकने ज्या प्रमाणे वाहनांची तोडफोड केली होती त्याच प्रमाणे कर्नाटकातीलही वाहनांचीही तोडफोड करणार असल्याचा इशारा राज्यातील राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी इशारा दिला आहे.

त्यामुळे आता कर्नाटकमधील नागरिकांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक केली तर कर्नाटकमधील एकही बस महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

कर्नाटकातील नागरिकांनी आमच्या बसेस फोडल्या तर आम्हीदेखील सेम रिऍक्शन देऊ असा थेट इशारा देण्याता आला आहे.

कन्नडिग्गांनी जर महाराष्ट्राच्या वाहनांवर आणि बसवर दगडफेक केली, त्यांची तोडफोड केली तर त्याच प्रकारची रिअॅक्शन देण्यात येईल असं मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी कर्नाटक सरकारला गर्भित इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून ज्या प्रकारे कर्नाटकचे मुख्यमंत्री वागत आहेत, त्यांचे वागणं चुकीचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणून-बुजून दोन राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असंही मनसेकडून आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.

कर्नाटकची लोकं जर महाराष्ट्राच्या लोकांवर हल्ला करत असतील तर त्याच प्रमाणे सेम रिएक्शन देण्यात येईल असा इशारा दिला आहे.

त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्राच्या बसवर कर्नाटकात हल्ला होत असेल तर कर्नाटकातील एकही बस महाराष्ट्रात येऊ देणार नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी इशारा दिला आहे.