“लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची ही नांदी”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं नेमकं ते ट्विट केलं…

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची ही नांदी; राष्ट्रवादीच्या नेत्यानं नेमकं ते ट्विट केलं...
| Updated on: May 13, 2023 | 11:13 PM

मुंबई : कर्नाटक विधानसभेचा आज निकाल लागल्यानंतर देशभरात काँग्रेसने जल्लोष साजरा केला आहे. या काँग्रेसच्या विजयामध्ये राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्षही त्यामध्ये सहभागी होऊन काँग्रेसच्या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. काँग्रेसने कर्नाटकात विजयाची जोरदार मुसंडी मारली आहे, त्यामुळे आता देशातील राजकीय वातावरण बदलत असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ट्विट करत त्यांनी कर्नाटक विधानसभेच्या काँग्रेसच्या विजयाचे विश्लेषण केले आहे. अजित पवार यांनी ट्विट करत त्यांनी थेट भाजपलाही इशारा दिला आहे.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे एकत्र आहेत. त्यामुळे आता राज्यातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

महाविकास आघाडीकडून टीका करताना भाजपकडून लोकशाहीला धोका असल्याची टीका केली जात आहे. भाजपकडून लोकशाहीला धोका आहे अशी विरोधकांकडून टीका केली जाते. त्या टीकेला धरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

अजित पवार यांनी आजच्या निकालानंतर ट्विट करत त्यांनी भाजपला एक प्रकारचा इशाराच दिला आहे. त्यांनी आता दक्षिण भारतात कोणत्याही निवडणुकीत भाजपला विजय मिळवणे कठीण जाणार असल्याचे सांगत कर्नाटक विधानसभेच्या निमित्ताने मात्र आता नाकाबंदी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे.

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे, त्याचबरोबर अजित पवार यांनी कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं अभिनंदनही त्यांनी केले आहे. अजित पवार यांच्या या ट्विटमुळे मात्र राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.