AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आघाडी सरकारचा ‘कौशल्य विकास’, एका महिन्यात दिला 10 हजार बेरोजगारांना रोजगार

राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाने जबरदस्त कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटात रोजगार गमवाव्या लागलेल्या 10 हजार 886 बेरोजगारांना या विभागाने रोजगार मिळवून दिले आहेत.

आघाडी सरकारचा 'कौशल्य विकास', एका महिन्यात दिला 10 हजार बेरोजगारांना रोजगार
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 7:02 PM
Share

मुंबई: राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाने जबरदस्त कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटात रोजगार गमवाव्या लागलेल्या 10 हजार 886 बेरोजगारांना या विभागाने रोजगार मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे अवघ्या एका महिन्यात म्हणजे मे महिन्यातच या दहा हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. (kaushalya department has provided 10 thousand jobs maharashtra youth)

राज्याचे अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. या मे महिन्यामध्ये विभागाकडे 21 हजार 710 इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 5 हजार 430, नाशिक विभागात 4 हजार 957, पुणे विभागात 5 हजार 508, औरंगाबाद विभागात 3 हजार 148, अमरावती विभागात 1 हजार 256 तर नागपूर विभागात 1 हजार 411 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. मे महिन्यामध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 10 हजार 886 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 3 हजार 616, नाशिक विभागात 2 हजार 794, पुणे विभागात 3 हजार 449, औरंगाबाद विभागात 881, अमरावती विभागात 106 तर नागपूर विभागात 40 इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली.

यंदा 63 हजार 55 बेरोजगारांना रोजगार

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून सन 2020मध्ये राज्यात 1 लाख 99 हजार 486 उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तर चालू वर्षात जानेवारी ते मे अखेर 63 हजार 55 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक

राज्य सरकारने https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यास सुरुवात केली आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते, असं त्यांनी सांगितलं.

ऑनलाईन मेळावेही

महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत 89 हजार 938 इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. (kaushalya department has provided 10 thousand jobs maharashtra youth)

संबंधित बातम्या:

पीक विम्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांचं गंगाखेड तालुक्यात आत्मक्लेश आंदोलन

मोफत लस आणि अन्नधान्य देण्याचा केंद्राचा निर्णय स्वागतार्ह, ठाकरे सरकारने पंतप्रधानांचा आदर्श घ्यावा; रामदास आठवलेंचा टोला

मुंबई तुंबू नये म्हणून पालिका अ‍ॅलर्ट; रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

(kaushalya department has provided 10 thousand jobs maharashtra youth)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.