AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anand Dighe: हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे!; केदार दिघेंनी मुख्यमंत्र्यांना दिला मोर्चाचा इशारा

केदार दिघे यांच्या या ट्विटमुळे ठाण्यातील राजकारण हे आणखी तापणार असल्याचेच चित्र दिसत आहे. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी केले नसले तरी शिवसैनिकांनी मात्र बंडखोर आमदारांना गाड्या फोडण्याचा इशारा दिला आहे.

Anand Dighe: हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे!; केदार दिघेंनी मुख्यमंत्र्यांना दिला मोर्चाचा इशारा
| Updated on: Aug 02, 2022 | 11:25 PM
Share

मुंबईः सध्या राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे दौरे, आदित्य ठाकेर यांची निष्ठा यात्रा आणि शिवसैनिकांबरोबर होत असलेला उद्धव ठाकरे यांच्या संवादामुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. या घटना सुरू असतानाच आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पुतण्यावर बलात्काराचा आरोप (Nephew Rape Case) करण्यात आल्याने आता ठाण्यातील शिवसैनिक आक्रमक होत जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई कराल, दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल..! असा इशारा आता केदार दिघे यांनी ट्विट करुन दिला आहे. त्यामुळे हे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसत आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

राज्यातील आजचा दिवस प्रचंड राजकीय घडामोडींनी प्रचंड चर्चेत राहिला आहे. पुण्यातील मुख्यमंत्र्यांच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर काही तासातच माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करुन काच फोडण्यात आली असतानाच ठाण्यामध्ये आनंद दिघे यांच्या पुतण्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. केदार दिघे यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर

या सर्व घटनांनी आता शिवसैनिक आक्रमक होत शिवसेनास्टाईलने आंदोलन आणि क्रियेला प्रतिक्रियेने उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. त्याच स्टाईलने आता केदार दिघे यांनीही ट्विट करत मुख्यमंत्र्यांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. केदार दिघे या घटनेनंतर काही वेळात ट्विट करत हा इशारा नाही शिवसैनिकांच्या मनातील संताप आहे! असं म्हणत ठाणे हा शिवसेनेचा,दिघेसाहेबांचा बालेकिल्ला आहे जर जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकांना सत्तेचा वापर करून स्वार्थासाठी चुकीची कारवाई करत असाल आणि दबाव टाकाल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना सोबत घेऊन मोर्चा काढावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे.

ट्विटमुळे ठाण्यातील राजकारण आणखी तापणार

केदार दिघे यांच्या या ट्विटमुळे ठाण्यातील राजकारण हे आणखी तापणार असल्याचेच चित्र दिसत आहे. उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे समर्थन शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी केले नसले तरी शिवसैनिकांनी मात्र बंडखोर आमदारांना गाड्या फोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता या राजकीय घडामोडींचा शेवट काय होणार याकडेच साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.