किशोरी पेडणेकर यांचा भाजपच्या या नेत्यावर घणाघात, म्हणाल्या, दबावतंत्र कसा असतो हे दाखवायला मी आलेय

| Updated on: Nov 28, 2022 | 8:29 PM

वाटलं भावाला समोर भेटू. समोर बस, बोल माझ्याशी.

किशोरी पेडणेकर यांचा भाजपच्या या नेत्यावर घणाघात, म्हणाल्या, दबावतंत्र कसा असतो हे दाखवायला मी आलेय
किशोरी पेडणेकर
Follow us on

मुंबई – २०१७ चा फार्म भरून तिथला पत्ता दिला होता. हे सत्य आहे. पण, त्यांचा आरोप आहे की, मी गाळे बळकावले. त्याचं व्हेरिफिकेशन एसआरएनं केलंय. भावा ये, समोर बस बोल माझ्याशी. किती प्रेशर टाकायचे एसआरए वाल्यावर, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला. मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या कार्यालयात आज भाजप नेते किरीट सोमय्या आणि किशोरी पडणेकर या एका मागोमाग आल्या होत्या. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

या सगळ्याचे कथित पुरावेही किरीट सोमय्या यांनी सादर केले होते. आज मुंबई महानगरपालिकच्या जी/दक्षिण विभागात येऊन या प्रकरणाचा सोमय्या यांनी अधिकाऱ्यांकडून फॉलोअप घेतला.

सोमय्या हे कार्यालयात येत असल्याची माहिती मिळतात माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील त्या ठिकाणी पोहोचल्या. मात्र तोपर्यंत सोमय्या निघून गेले होते. मला असं कळलं की सोमय्या जी/दक्षिण वॉर्ड ला येत आहेत. तेव्हा वाटलं भावाला समोर भेटू. समोर बस, बोल माझ्याशी. किती प्रेशर टाकायचे एसआरए वाल्यावर अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिलीय.

किशोरी पेडणेकर या संदीप देशपांडे यांच्याबाबत बोलताना म्हणाले, एक दिवसाची का होईना असं जर त्यांचं म्हणणं असेल तर तू शेपूट घालून कुठे बसला होतास. अरे, त्याला काय बोलतात आणि थांबा जरा कळेल पाच-सहा दिवसात, असा इशाराच किशोरी पेडणेकर यांनी दिला.