
मुंबई : मुंबईमधील कोरोना संसर्गाचा दर पाहता मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केलीय. सध्या मुंबईचा कोरोना संसर्ग दर 3.96 टक्के असून कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के आहे. तसेच मुंबईतील कोरोना रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. याशिवाय कोरोना डबलिंग रेट 723 दिवसांवर पोहचलाय. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू झाले आहेत (Know all restriction in Mumbai for third phase BMC declared new rules).