AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ‘या’ कामासाठी बेस्टची WHO कडून दखल

कोरोना काळात केलेल्या कामासाठी थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून बेस्टची दखल घेण्यात आलीय. त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे.

मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'या' कामासाठी बेस्टची WHO कडून दखल
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jun 25, 2021 | 8:04 PM
Share

मुंबई : कोरोना काळात केलेल्या कामासाठी थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून बेस्टची दखल घेण्यात आलीय. त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल (एम.डी.) यांना जागतिक आरोग्य संघटनेने कोविड मुक्त मोहिमेसाठी बाह्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून आमंत्रित केलंय. बेस्टच्या या सामुदायिक कार्याची दखल यापूर्वी जिनिव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही घेतली होती (WHO invite Mumbai Best chief medical officer for his Covid work).

जागतिक आरोग्य संघटना (WHO), जी-20 (G-20 leader country), युरोपीयन युनियन (European Commission), फिंड (FIND), मेलिंडा अँड बिल गेट फाऊंडेशन (Melinda & Bill Gate foundation) यांनी एक मोहिम सुरू केलीय. यात The Access to Covid-19 Tools Accelerator(ACT-A) या मोहिमेअंतर्गत तात्काळ अॅंटिजेन टेस्टद्वारे कोविड मुक्तीचं काम हाती घेण्यात आलंय. आता या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी बेस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार सिंगल (एम.डी.) यांना बाह्य तज्ञ सल्लागार 28 जून 2021 रोजी आमंत्रित केलं आहे.

“कार्यक्षम सेवेची अखंड परंपरा” या ब्रीदवाक्याला अनुसरून कोविड टाळेबंदी काळात इतर सर्व वाहतूक सेवा बंद असताना बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता पालघर, आसनगाव, बदलापूर, पनवेल पर्यंत आपल्या बसगाड्यांद्वारे वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्या. तसेच बेस्टच्या वीज कर्मचाऱ्यांनी देखील न घाबरता नवीन कोविड सेंटरला त्वरित वीज पुरवठा उपलब्ध करून दिला आणि युद्धपातळीवर कोविड हॉस्पिटल व संसर्गजन्य विभागात वीजपुरवठा पुनर्स्थापित करून दिला. म्हणूनच कोविड महामारीत बेस्ट मुंबईची मुख्य लाईफ लाईन म्हणून उदयास आली आहे.

कर्मचाऱ्यांना कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बेस्टने केलेल्या उपाययोजना

  • सहविकृतीग्रस्त, दिव्यांग व कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्यात आली
  • 10 हजार पेक्षा जास्त जनजागृती अभियानांच्या मदतीने कर्मचाऱ्यांमध्ये कोविड प्रतिबंध दक्षतेची अंमलबजावणी केली
  • कर्मचाऱ्यांना लागणारी सॅनिटाइजर, मास्क, हॅंडग्लोव्ज यासारखी वैयक्तिक संरक्षणाची साधने उपलब्ध करून दिली.
  • कोविडचे तत्पर निदान करण्यासाठी 25 हजार कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी व 18 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या बस आगारात तात्काळ अॅंटिजेन चाचण्या करण्यात आल्या
  • “तुम्ही कसे आहात? ” या मोहिमेअंतर्गत कोविड संसर्गबाधित कर्मचाऱ्यांशी दररोज दोन वेळा दूरध्वनीद्वारे संवाद साधून गरज भासल्यास त्यांना कोविड सेंटर/ हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात पुढाकार घेतला
  • सुरळीत लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत 80 टक्के कर्मचाऱ्यांनी प्रथम मात्रा व 60 टक्के पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्राही घेतलेली आहे.

अशा उपाययोजनांमुळे संपूर्ण मुंबई कोविडमुळे अतिबाधित झाली असताना देखील पहिल्या लाटेत 2900 व दुसऱ्या लाटेमध्ये केवळ 565 बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली.

हेही वाचा :

मुंबई, ठाणे आणि रायगडमधील नागरिकांचा वीज बिल भरण्यास नकार; 693.99 कोटींचे बिल थकीत

ट्राम आली रे… मुंबईकरांना ब्रिटिशकालीन ट्राम पाहता येणार, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईकरांच्या खिशाला कात्री? वीज बिलामध्ये 50 रुपयांच्या वाढीचा शॉक?

व्हिडीओ पाहा :

WHO invite Mumbai Best chief medical officer for his Covid work

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...