ट्राम आली रे… मुंबईकरांना ब्रिटिशकालीन ट्राम पाहता येणार, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

ट्राम आली रे... मुंबईकरांना ब्रिटिशकालीन ट्राम पाहता येणार, महापौरांच्या हस्ते लोकार्पण

ब्रिटिश काळात परिवहन सेवेमध्ये महत्त्वपूर्ण मानबिंदू असलेली पुरातन ट्राम मुंबईकरांना आता पुन्हा बघता येणार आहे (Mumbaikars will now see the ancient trauma in Bhatia Garden).

चेतन पाटील

|

Feb 25, 2021 | 4:37 PM

मुंबई : ब्रिटिश काळात परिवहन सेवेमध्ये महत्त्वपूर्ण मानबिंदू असलेली पुरातन ट्राम मुंबईकरांना आता पुन्हा बघता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील भाटिया बाग उद्यानामध्ये ही ट्राम बसविण्यात आली आहे. या ट्रामचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज (25 फेब्रुवारी) पार पडले. याप्रसंगी उप महापौर सुहास वाडकर, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुजाता सानप, उपायुक्त (परिमंडळ -१) हर्षद काळे, “ऐ” विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव तसेच संबंधित महापालिका अधिकारी उपस्थित होते (Mumbaikars will now see the ancient trauma in Bhatia Garden).

“कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी न करण्याचे केलेल्या आवाहनानुसार अत्यंत मोजक्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. मुंबईचे गतवैभव मुंबईकरांना पुन्हा अनुभवता यावे या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्टकडून ही ट्राम घेऊन भाटिया बागमध्ये बसविण्यात आली आहे”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली (Mumbaikars will now see the ancient trauma in Bhatia Garden).

“बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐ विभागाच्या वतीने या ट्रामचे नूतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे. नागरिकांना बाहेरून ही ट्राम बघता येणार आहे”, असं महापौरांनी सांगितलं. तसेच या ट्रामध्ये संपूर्ण प्रकाशयोजना करण्यात आली आहे. त्याचे देखणे स्वरूप आता यापुढे मुंबईकरांना अनुभवता येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

सदर ट्राम सामान्य जनतेला पाहता यावी यासाठी मार्गदर्शन करणारे ‘बेस्ट’ संग्रहालयाचे संचालक यतीन पिंपळे यांचा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे महापौरांनी यावेळी विशेष कौतुक केले.

तत्पूर्वी, महापौर किशोरी पेडणेकर यांनी ऐ विभागातील वॉररूम, आपत्कालीन कक्ष तसेच नागरी सुविधा केंद्राची पाहणी केली. वॉररूमच्या माध्यमातून ऐ विभागातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती महापौरांनी जाणून घेतली. त्याचप्रमाणे नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून महसूल कशा पद्धतीने गोळा करण्यात येत आहे, याचाही आढावा महापौरांनी यावेळी घेतला. तसेच आपत्कालीन कक्षाला भेट दिल्यानंतर आपत्कालीन घटनांप्रसंगी वापरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचा आढावा महापौरांनी यावेळी घेतला.

हेही वाचा : …तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील; नितीन गडकरींचा इशारा नेमका कोणाला?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें