मुंबई, ठाणे आणि रायगडमधील नागरिकांचा वीज बिल भरण्यास नकार; 693.99 कोटींचे बिल थकीत

मुंबईसह अनेक ठिकाणच्या ग्राहकांनी 693.99 कोटींचे बिल थकवले जात आहे. (People Electricity bill exhausted)

मुंबई, ठाणे आणि रायगडमधील नागरिकांचा वीज बिल भरण्यास नकार; 693.99 कोटींचे बिल थकीत
वीज वाहिनी
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 9:46 AM

मुंबई : कोरोना काळात ग्राहकांना आलेली अव्वाच्या सव्वा वीज बील आकारण्यात आलं होतं. यामुळे अनेक ग्राहकांचे वीज बिल थकले आहेत. मुंबईसह अनेक ठिकाणच्या ग्राहकांनी 693.99 कोटींचे बिल थकवले जात आहे. यात मुंबई, ठाणे, रायगडमधील विजेचे थकबाकीदार मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही ग्राहकांनी मार्च 2020 पासून विजेचे बील भरलेले नाही. त्यामुळे वीज वितरण विभागाला गंभीर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  (Mumbai Thane Raigad People Electricity bill exhausted)

वीजबिलाबाबत दिलासा नाही

राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले.

तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले देण्यात आली. आर्थिक स्थिती आधीच कमकुवत झालेल्या अनेकांनी विजेची बील भरले नाही. यानतंर या वीजबिलांवर सवलत दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र काही महिन्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्टीकरण दिले होते. वीजबिलाबाबत सरकारकडून काही ना काही सवलत मिळेल या आशेवर असलेल्या अनेकांची घोर निराशा झाली.

लाखो ग्राहकांचे वीजबील थकित

तर दुसरीकडे त्यांच्या विजेचे अनेक महिन्यांचे बील थकले. आतापर्यंत लाखो ग्राहकांचे तब्बल 693.99 कोटी रुपयांचे विजेचे बील थकले आहे. यातील बहुतांश थकबाकीदार हे मुंबई, ठाणे आणि रायगडमधील आहेत. यातील काही ग्राहकांनी मार्च 2020 पासून विजेचे बील भरलेले नाही. त्यामुळे ही थकबाकी वाढली आहे. या सर्वांचा परिणाम वीज वितरण कंपन्यांना भोगावा लागत आहे.

एकूण किती वीजबिलाची थकबाकी 

ग्राहक थकबाकी                 (काेटी रुपयांमध्ये)

उच्चदाब व घरगुती ग्राहक – 180.29 कोटी व्यवसायिक ग्राहक – 140.94 कोटी औद्योगिक ग्राहक – 150.85 कोटी इतर वर्गवारीतील ग्राहक -18.3 कोटी पाणीपुरवठा योजना – 7.66 कोटी स्ट्रीट लाईट – 111.57 कोटी कृषी ग्राहक – 4.39 कोटी

एकूण – 693.99 कोटीची थकबाकी

(Mumbai Thane Raigad People Electricity bill exhausted)

संबंधित बातम्या : 

100 युनिटपर्यंत वीजबिल माफीचा प्रस्ताव पूर्णपणे बारगळलेला नाही, आम्ही त्यावर विचार करतोय : नितीन राऊत

वाढीव वीजबिलावरोधात मनसे महिला कार्यकर्त्या आक्रमक, आमरण उपोषणाचा इशारा

BJP Protest for Electricity Bill Relief | वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी वीजबिल होळी आंदोलन

Non Stop LIVE Update
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका
तुकाराम मुंडे यांची बदली अमेरिका किंवा चीनला करा, कुणाची सरकारवर टीका.
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा
'छगन भुजबळ यांची पक्षात गळचेपी, सरकारमध्ये ते राहणार नाही', कुणचा दावा.
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या
वसईतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल, रूपाली चाकणकर म्हणाल्या.
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले..
वसईत माणुसकीची हत्या, तरुणीवर लोखंडी पान्याने वार, बघणारे बघत राहिले...
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी? रात्री शिंदे फडणवीसांमध्ये काय चर्चा.
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी
पुण्यात ओबीसी संघटनांचं आंदोलन, थेट सगेसोयरे 'जीआर'ची होळी.
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?
बाळासाहेबांच्या स्मारकाचं लवकरच लोकार्पण, जनतेसाठी कधी होणार खुलं?.
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद
देवाने मला संघर्ष.., पंकजा मुंडेंची पुन्हा कार्यकर्त्यांना भावनिक साद.
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण....
'मरे'च्या प्रवाशांसाठी खुशखबर, आता वेळेत ऑफिसला पोहोचता येणार कारण.....
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?
राज्यात 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 24 तास मुंबईसाठी कसे?.