Mumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील मालाड येथील कोविड सेंटर येत्या आठ दिवसांत सुरु केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  यांनी दिली आहे (Mumbai Started Preparation for corona third wave) 

Mumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज
Corona Mumbai

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तब्बल पाच ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे. यात 70 टक्के बेड हे ऑक्सिजनयुक्त असणार आहेत. (Mumbai Started Preparation for corona third wave)

मुंबईत 5 ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईची सज्जता पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत 7 हजार बेडची तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2, कांजूरमार्ग या 5 ठिकाणी नवे कोव्हिड सेंटर उभारण्यात येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हे नवे कोरोना सेंटर उभारण्याचा काम सुरु आहे.

70 टक्के बेड ऑक्सिजनयुक्त

मुंबईत उभारण्यात येणारे नवे कोविड सेंटरचे 70 टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहे. तर यात काही विशेष पेडियॉट्रीक वॉर्डही असणार आहे. मुंबईतील मालाड येथील कोविड सेंटर येत्या आठ दिवसांत सुरु केले जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी  यांनी दिली आहे

लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड

मुंबईतील मालाड कोविड सेंटरमध्ये 2170 बेड उपलब्ध आहेत. हे सेंटर तिसऱ्या लाटेसाठी पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. यात मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2, कांजूरमार्ग या पाच ठिकाणांचा समावेश आहे. यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करण्यात आला आहे. यात एकूण 7000 बेड उपलब्ध होणार आहेत
मुलासोबत त्यांच्या पालकांना देखील राहण्यासाठी सुविधा उपलब्ध असणार आहे, असेही सुरेश काकाणी म्हणाले.

राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण

दरम्यान भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव AY.1 Variant असं देण्यात  आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळले आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची दिली. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंतेत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे.  (Mumbai Started Preparation for corona third wave)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची तिसरी लाट गंभीर, एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, धनंजय मुंडेंचा संकल्प

गोंदियात कोरोना संसर्ग आटोक्यात, पॉझिटिव्हीटी रेटही घटला, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

लॉकडाऊन काळात वैवाहिक जीवनातही विष कालवले, दीड वर्षात पती-पत्नी कलहाच्या 376 तक्रारी