कोरोनाची तिसरी लाट गंभीर, एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, धनंजय मुंडेंचा संकल्प

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बीडमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे. (Corona third wave will not die single person in Beed said Minister Dhananjay munde)

कोरोनाची तिसरी लाट गंभीर, एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, धनंजय मुंडेंचा संकल्प
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 8:20 AM

संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी (बीड) : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बीडमध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प केला आहे. (Corona third wave will not die single person in Beed said Minister Dhananjay munde)

कोरोनाची येणारी तिसरी लाट गंभीर

कोरोनाची येणारी तिसरी लाट ही गंभीर आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी परळी सज्ज आहे. त्यासोबतच परळीतील एकाही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते परळीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत एकही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही

परळी शहरातील हलगे गार्डनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 24 तास सेवा देणाऱ्या हातांचा गौरव, “सेवा गौरव समारोहा” च्या माध्यमातून पार पडला. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. या कार्यक्रमामध्ये डॉक्टर्स, आरोग्य सेवक, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पत्रकार यांसह कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या दूतांचा गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत एकही व्यक्तीचा मृत्यू होऊ देणार नाही, असा संकल्प त्यांनी केला.

राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण

दरम्यान भारतात सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होते आहे. मात्र, कोरोना विषाणू सतत रुप बदल आहे. कोरोनाच्या बदलत्या वेरियंटमुळे चिंता कायम आहे. कोरोना वायरसच्या नव्या रुपाला डेल्टा प्लस हे नाव देण्यात आलं आहे. डेल्टा प्लसला शास्त्रीय नाव AY.1 Variant असं देण्यात  आलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरियंटचे 21 रुग्ण आढळले आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची दिली. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्राची चिंतेत वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लसचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे.  (Corona third wave will not die single person in Beed said Minister Dhananjay munde)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

महाराष्ट्राची चिंता वाढली, राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण, रत्नागिरी, जळगावनं टेन्शन वाढवलं

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.