लॉकडाऊन काळात वैवाहिक जीवनातही विष कालवले, दीड वर्षात पती-पत्नी कलहाच्या 376 तक्रारी

गोंदिया जिल्ह्यात सन 2020 मध्ये 291 तक्रारी, तर सन 2021 च्या मेपर्यंत 85 तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या. मार्च 2020 पासून 125 पती-पत्नीचा वाद भरोसा सेलने मिटवला.

लॉकडाऊन काळात वैवाहिक जीवनातही विष कालवले, दीड वर्षात पती-पत्नी कलहाच्या 376 तक्रारी
तुमच्या वैवाहिक जीवनाला दृष्ट लागली असेल तर करा हा उपाय
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 1:43 PM

गोंदिया : व्यसनाधीनता, चारित्र्यावर घेतलेला संशय, घरातील क्षुल्लक कारणे, मोबाईल आणि सोशल मीडियाचा वाढलेला अतिवापर, प्रेमप्रकरणे आणि अनैतिक संबंध यातून पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. मागील सव्वा वर्षापासून कोरोनाने कहर केला. या कोरोनामुळे घरात पती-पत्नीत वाद होऊ लागल्याने वैवाहिक जीवनात विष कालवले जात आहे. गोंदिया जिल्ह्यात 2020 च्या मार्चपासून आतापर्यंत पोलिसांच्या भरोसा सेलकडे 376 तक्रारी आल्या आहेत. (Gondia Hingoli Bharosa Cell receives 376 complaints of Couples Dispute)

पती-पत्नी वादाचे कारण काय?

पती-पत्नीच्या वादाचे महत्त्वाचे कारण मोबाईल होते. नोकरी गेली म्हणून पतीची असलेली व्यसनाधीनता, पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावर घेतला जाणार संशय हा घराची शांती भंग करण्यास कारणीभूत होत असतो. यातून पती-पत्नीत क्षुल्लक-क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विकोपाला जातात. त्यातून परिस्थिती हाताबाहेर जाऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत जात आहे. महिला किंवा पुरुषांकडून मोबाईलचा अतिवापर किंवा सोशल मीडियावर टाकलेली धूम ही सर्व कारणे पत्नी-पत्नीच्या संसाराला ग्रहण लागत आहेत.

तक्रारींची आकडेवारी काय सांगते?

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे पुरुषवर्ग घरी बसला. कामाच्या नादात बायकोला वेळ न देणारे पुरुष बायकोसोबत तासन्‌तास घालवू लागल्याने काही दिवसांतच पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊ लागले. नोकरी गेल्याच्या टेन्शनपेक्षा चारित्र्याचे टेन्शन अधिक वाढू लागले. गोंदिया जिल्ह्यात सन 2020 मध्ये 291 तक्रारी, तर सन 2021 च्या मेपर्यंत 85 तक्रारी पोलिसांच्या भरोसा सेलकडे प्राप्त झाल्या. मार्च 2020 पासून 125 पती-पत्नीचा वाद भरोसा सेलने मिटवला. त्यांना पुन्हा वैवाहिक जीवन सुखकर करण्याचा मार्ग दाखविला.

पती-पत्नी घरातच असल्याने आठवडा त्यांनी गुण्यागोविंदाने काढल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले. क्षुल्लक-क्षुल्लक कारणातून त्यांच्यात वाद होऊ लागले. परिणामी छोटे वाद घर उद्‌ध्वस्त होण्यापर्यंत पोहोचले. परंतु, भरोसा सेलने अनेक कुटुंबं सांभाळली.

हिंगोलीतही लॉकडाऊनमध्ये वाद विकोपाला

दुसरीकडे, हिंगोलीतही कोरोना काळात पती पत्नीमध्ये स्नेह वाढण्याऐवजी वादाचे प्रकार वाढले आहेत. यामध्ये पुरुषांचाही छळ झाल्याच्या 150 च्या वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण भरोसा सेलकडे 758 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी तबल 150 च्या वर विविध कारणे देत पुरुषांच्याही तक्रारी आहेत. कोरोना काळात नोकरी गेली, व्यनवसाय बुडाला, यामुळे तणाव निर्माण झाल्याने चिडचिडपणात वाढ झाली. त्यामुळे पती-पत्नीत वाद निर्माण झाले. यात सर्वाधिक कारणीभूत ठरले आहेत फेसबुक-व्हॉट्सअॅपसारखे सोशल मीडिया. सुदैवाने 252 जोडप्यांचे संसार कोरोना काळात भरोसा सेलमुळे पुन्हा जुळले आहेत.

संबंधित बातम्या :

कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

भरोसा सेलने संसार सावरले, सहा महिन्यात बुलडाण्यात 72 कुटुंबांतील कलह मिटले

(Gondia Hingoli Bharosa Cell receives 376 complaints of Couples Dispute)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.