गोंदियात कोरोना संसर्ग आटोक्यात, पॉझिटिव्हीटी रेटही घटला, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष करणे पुन्हा कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. (Corona Patient Decrease in Gondia district On the way Corona Free)

गोंदियात कोरोना संसर्ग आटोक्यात, पॉझिटिव्हीटी रेटही घटला, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल
Corona Update

शाहिद पठाण, टीव्ही  9 मराठी, गोंदिया : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने खालावत असून मात करणाऱ्यांचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. (Corona Patient Decrease in Gondia district On the way Corona Free)

सद्य:स्थितीत गोंदिया जिल्ह्यात केवळ 57 कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. गोंदिया जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तर मागील सात दिवसांपासून जिल्ह्यात एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही. गोंदिया जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.19 आहे. त्यामुळे राज्यात सर्वात कमी पाझिटिव्हीटी असलेल्या गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे ही बाब निश्चित समाधानकारक आहे.

गोंदियातील चार तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर

गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत आहे. तर चार तालुके लवकरच कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष करणे पुन्हा कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच काळजी घेण्याची गरज आहे.

आतापर्यंत तब्बल 41 हजार कोरोनाबाधित 

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 41 हजार 061 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर तब्बल 697 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी आलेला खर्च, बेड मिळविण्यासाठी झालेली तारांबळ, औषधांचा तुटवडा यांसारखे अनेक कटू अनुभव गोंदियाकरांना भोगावे लागले आहेत.

3 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

तर कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार 652 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 2 लाख 67 हजार 946  नागरिकांना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 82706 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. (Corona Patient Decrease in Gondia district On the way Corona Free)

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे घर खरेदीचा पॅटर्न बदलला, शहराबाहेर घर खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती

खासगी रुग्णालयातील कोरोना मृत्यूंची सीआयडी चौकशी करा, सफाई कर्मचारी संघटनेचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

कोरोनाच्या धास्तीमुळे गोंदियाकरांनी पाळणा लांबवला, जन्मदरात कमालीची घट