कोरोनाच्या धास्तीमुळे गोंदियाकरांनी पाळणा लांबवला, जन्मदरात कमालीची घट

कोरोना काळात अचानक वाढलेली बाधित रुग्णांची संख्या, कोरोनाने झालेले मृत्यू, कोरोनावर उपचार करण्यासाठी झालेली तरांबळ गोंदियाकरांनी जवळून बघितली आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे गोंदियाकरांनी पाळणा लांबवला, जन्मदरात कमालीची घट
प्रातिनिधिक फोटो
शाहिद पठाण

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 20, 2021 | 4:45 PM

गोंदिया : कोरोना काळात अचानक वाढलेली बाधित रुग्णांची संख्या, कोरोनाने झालेले मृत्यू, कोरोनावर उपचार करण्यासाठी झालेली तरांबळ गोंदियाकरांनी जवळून बघितली आहे. कोरोनाचे दाहक वास्तव गोंदियाकरांनी अनुभवले आहे. त्यामुळेच कोरोना काळातही लग्नसमारंभ मोठा गाजावाजा न करता पार पाडले. गोंदियात मागील दीड वर्षात लग्न समारंभ झाले खरे, मात्र लग्न झालेल्या जोडप्यांनी तसेच इतर जोडप्यांनी कोरोना काळात आपली अडचण होऊ नये म्हणून काळजी घेत पाळणा लांबणीवर टाकला आहे. त्याचाच परिणाम म्हणून गोंदिया जिल्ह्यात जन्मदर घटला आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ठ झाले आहे. (Birth rate falls in Gondia in corona pandemic situation)

गोंदिया जिल्ह्यात 2019-2020 मध्ये 17 हजार 305 जन्मांची तर 2020-2021 मध्ये 15 हजार 982 अपत्यांच्या जन्मांची नोंद झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 1 हजार 323 बालके कमी जन्माला आली आहेत. दरम्यान 2021- 2022 मध्ये आतापर्यंत केवळ 1 हजार 185 बालकांच्या जन्माच्या नोंदी झाल्या आहेत. इतर वर्षांच्या तुलनेत कोरोना काळात जवळपास दिड हजार मुलं कमी जन्माला आली आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाची धास्ती. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जोडप्यांनी पाळणा लांबवला आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे अनेक जोडप्यांनी गर्भधारणा होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या. त्यामुळे या काळात पाळणा लांबणीवर गेल्याचे अनेकांचे मत आहे.

वर्ष आणि जन्मदर (आकडेवारी)

  • 2018-19 – 17,332
  • 2019-20 – 17,305
  • 2020-21 – 15,982
  • 2021-22 – 1,185

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 41 हजार 061 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून तब्बल 697 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी आलेला खर्च, बेड मिळविण्यासाठी झालेली तारांबळ, औषधांचा तुटवडा यांसारखे अनेक कटू अनुभव गोंदियाकरांना भोगावे लागले आहेत. त्यामुळे गोंदियाकरांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची धास्ती घेत पाळणा लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात जन्मदरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. त्यातच आता कोरोनाची संभावित तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे अधिकच भीती निर्माण झाली आहे.

इतर बातम्या

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 81 दिवसांनी दिलासादायक बातमी

लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं पहिलं राज्य, ‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला

Coronavirus in India: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; 1,647 जणांचा मृत्यू

(Birth rate falls in Gondia in corona pandemic situation)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें