वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काय आहेत सुविधा, रेल्वेत किती मोठा झाला आहे बदल ? पाहा Video

वंदे भारत रेल्वेचे आकर्षण अनेकांना आहे. अनेक जण ही रेल्वे पाहण्यासाठी येत आहेत. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये काय आहेत सुविधा, रेल्वेत किती मोठा झाला आहे बदल ? पाहा Video
| Updated on: Feb 11, 2023 | 8:23 AM

सागर सुरवसे, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेसचे ( Vande Bharat Train ) उद्घाटन केले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून दोन्ही एक्स्प्रेसला सुरुवात झाली. सीएसएमटीवरुन एक वंदे भारत ट्रेन नाशिक मार्गे शिर्डीला ( Nashik – shirdi ) जाणार आहे. तर दुसरी वंदे भारत ट्रेन मुंबईवरुन पुणे मार्गे सोलापूरला जाणार आहे. या रेल्वेचे आकर्षण अनेकांना आहे. अनेक जण या गाड्या पाहण्यासाठी येत आहेत. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येणार आहे. यामुळे विमानपेक्षा जास्त पसंती वंदे भारत एक्स्प्रेसला मिळत आहे. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेल्या सुविधांचा घेतलेला हा विशेष आढावा..

 

काय आहेत सुविधा

  • या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
  • जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
  • लोणावळा घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
  • मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
  • अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
  • मुंबईहून सोलापूरला ही ट्रेन केवळ साडेसहा तासात पोहोचते
  • या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्यूटिव्ह कार अशा दोन प्रकारच्या बोगी

इगतपुरीला थांबा नाही

मुंबईवरुन शिर्डीला जाणारी वंदे भारत ट्रेन ही नाशिक मार्गे जात असतांना इगतपुरीला मात्र थांबणार नाहीयं. थेट नाशिकला येऊनच वंदे भारत ट्रेन येणार असून अवघे दोनचं मिनिटे ही ट्रेन थांबणार आहे.

सीएसएमटी ते शिर्डी हा टप्पा वंदे भारत ट्रेन अवघ्या पाच तास 20 मिनिटांत पार करणार आहे. त्यामध्ये मुंबई ते नाशिक हे अंतर अवघे दोन तास 37 मिनिटांत पूर्ण करणार आहे. त्यामुळे जलद वेगाने धावणारी ही ट्रेन आकर्षणाचा विषय ठरत आहे.

मुंबईते शिर्डी जवळपास 343 किलोमीटरचे अंतर आहे. यामध्ये सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी वंदे भारत ट्रेन सुटणार आहे. तर शिर्डीत ही ट्रेन दुपारी साडेकरा वाजता दाखल होणार आहे. तर साडेआठ वाजेच्या दरम्यान ही ट्रेन नाशिकरोड रेल्वेस्थानकावर असणार आहे.

धार्मिक स्थळांना जोडणार

नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आणि पुढे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस महत्वाची ठरणार असून जलद वेगाने प्रवास होणार असल्याने वेळेची बचत होणार आहे.