AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेचं काय होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेतील अलीकडील बदल आणि चिंतांबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेच्या निकषांमुळे अनेकांचे अर्ज रद्द झाल्याने निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भाष्य केले.

लाडकी बहीण योजनेचं काय होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मोठी माहिती
devendra fadnavis (9)
| Updated on: Mar 05, 2025 | 4:48 PM
Share

राज्य सरकारने निवडणुकांपूर्वी सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेची सध्या चांगलीच चर्चा आहे. सध्या या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावले जात आहेत. त्यामुळे लाखो लाडक्या बहि‍णींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल, अशी चर्चाही रंगली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे नेमकं काय होणार याबद्दल भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटला भेट दिली. यावेळी मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत आणि टीव्ही भारत वर्ष सीनिअर अँकर गौरव अगरवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले.

“लाडकी बहिणींसाठी ४५ हजार कोटी”

“राज्यातील सर्व योजनांचा निधी ६० हजार कोटी आहे. त्यात दोन मेजर कंपोनंट आहे. एक म्हणजे १५०० रुपये महिलांना देत आहोत. दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही विचार करून हा निर्णय घेतला आहे. लाडकी बहिणींसाठी ४५ हजार कोटी देत आहोत. त्याचा ताण आमच्या बजेटवर येणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महिलांना लखपती दिदी करणार”

“नागपूरमध्ये महिलांनी एक स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार केली आहे. त्यात १५०० रुपये टाकून ३० लाख रुपये टाकले आहेत. हे मॉडल आम्ही राज्यात नेणार आहोत. केवळ पैसे घेणाऱ्या नाही तर गुंतवणूकदार महिला तयार करणार आहोत. आम्हाला याच महिलांना लखपती दिदी करणार आहोत. अशा योजनामुळे रेव्हेन्यू डिफिशियट वाढवते. पण त्याचा सामाजिक दृष्टिकोन आहे. त्यामुळे आम्ही त्यात बॅलन्स साधत आहोत”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

उद्या कॅगही आम्हाला जाब विचारेल

“२ कोटी ८० लाख महिला त्यात आहे. आम्ही आधी छाननी केली नाही. योजना लागू केली. त्यात निकष होते. काही लोकांनी निकष पाहिले नाही. तरीही फायदा घेतला. त्यामुळे आम्ही निकषात बसणाऱ्यांनाच यात ठेवणार आहोत. उद्या कॅगही आम्हाला जाब विचारेल. पण छाननीतून फार महिलाांना डावललं जाणार नाही. कमी महिला अपात्र ठरतील”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?