मुंबईत ऐन गर्दीच्या वेळी लोकल कोलमडली, ट्रान्स हार्बर पूर्णपणे ठप्प

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल कोलमडली आहे. ट्रान्स हार्बर रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तुर्भे येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने, रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे. तुर्भे येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या अडीच तासांपासून ट्रान्स हार्बरवर वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. वाशी […]

मुंबईत ऐन गर्दीच्या वेळी लोकल कोलमडली, ट्रान्स हार्बर पूर्णपणे ठप्प
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल कोलमडली आहे. ट्रान्स हार्बर रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तुर्भे येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने, रेल्वेसेवेवर परिणाम झाला आहे.

तुर्भे येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बरच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या अडीच तासांपासून ट्रान्स हार्बरवर वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

वाशी आणि ऐरोली येथे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

“ट्रान्स हार्बरवरील तुर्भेजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दुरुस्तीचं काम वेगात सुरु आहे. पुढल्या 10 ते 15 मिनिटात काम पूर्ण होऊन रेल्वेसेवा पूर्ववत होईल.” असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.